Marathi News> भविष्य
Advertisement

Navratri 2023 : नवरात्रीत 400 वर्षात पहिल्यांदाच असा योगायोग! नवरात्रीच्या 9 दिवसात 9 शुभ योग

Navratri 2023 : यंदाची नवरात्री अतिशय खास आहे. 400 वर्षात पहिल्यांदाच नवरात्रीच्या 9 दिवसात 9 शुभ योग असणार आहे. 

Navratri 2023 : नवरात्रीत 400 वर्षात पहिल्यांदाच असा योगायोग! नवरात्रीच्या 9 दिवसात 9 शुभ योग

Navratri 2023 : हिंदू पंचांगानुसार आश्विन शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्री उत्सवाला सुरुवात होते. सर्वपित्री अमावस्या आणि सूर्यग्रहणाच्या दुसऱ्या दिवशीपासूनच नवरात्रीला सुरुवात होणार आहे. 15 ऑक्टोबरपासून 23 ऑक्टोबरपर्यंत देवाच्या नऊ रुपांची पूजा होणार आहे. हिंदू धर्मात कुठलेही काम करण्यापूर्वी शुभ काळ पाहिला जातो. यंदा शारदीय नवरात्रीतील 9 दिवसात शुभ कार्यासाठी शुभकाळ पाहण्याची गरज नाही. कारण तब्बल  400 वर्षात पहिल्यांदाच नवरात्रीच्या 9 दिवसात 9 शुभ योग जुळून आले आहेत. त्यामुळे शुभ कार्यासोबत नवीन काम, मालमत्ता किंवा गाडी इत्यादी कुठल्याही गोष्टींची खरेदी तुम्ही करु शकता. याचा अर्थ तुम्हाला शुभ कार्यासाठी दसऱ्याची वाट पाहण्याची गरज नाही. 

नवरात्रीच्या 9 दिवसात 9 शुभ योग

15 ऑक्टोबर - या दिवशी पद्मयोग आणि बुधादित्य योग आहे. या दिवशी चित्रा नक्षत्र असल्यामुळे खरेदी करण्यासाठी शुभ असणार आहे. भागीदारीसह नवीन आयुष्याला या दिवशी सुरुवात करु शकता. 

16 ऑक्टोबर - स्वाती नक्षत्र आणि भद्रा तिथीचा छत्रयोग आहे. या स्थितीत मोबाईल आणि लॅपटॉप खरेदीसाठी हा दिवश अतिशय शुभ आहे. 

17 ऑक्टोबर - प्रीती, आयुष्मान आणि श्रीवत्स योग आहे. अशा परिस्थितीत तुम्ही या दिवशी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि मोबाईल खरेदी करण्यास योग दिवस आहे. 
18 ऑक्टोबर - सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी असल्याने वाहन खरेदीसाठी हा दिवस अतिशय शुभ आहे.
19 ऑक्टोबर - या दिवशी ज्येष्ठ नक्षत्र आणि पूर्णा तिथीचा योग आहे. अशा परिस्थितीत या दिवशी मालमत्ता खरेदी करण्यास लाभ होईल. 

हेसुद्धा वाचा - Navratri 2023 : नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणत्या रंगाला आहे महत्त्व? देवीला नऊ माळा कोणत्या?


20 ऑक्टोबर - या दिवशी षष्ठीतिथी आणि मूल नक्षत्राचा रवि योग आहे. मालमत्ता खरेदी आणि मशिनरी पार्ट्स खरेदीसाठी हा दिवस खूप चांगला आहे.
21 ऑक्टोबर -  या दिवशी त्रिपुष्कर योग असून गुंतवणूक आणि नवीन सुरुवात केल्याने तिप्पट लाभ होणार आहे. 
22 ऑक्टोबर -  या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग आहे. बांधकामासाठी हा दिवस अतिशय शुभ आहे.
23 ऑक्टोबर - या दिवशी सर्वार्थ सिद्धी आणि रवि योगही असून तुम्ही काहीही खरेदी करू शकता. 

हेसुद्धा वाचा - Navratri 2023 : शारदीय नवरात्र कधी आहे? मुहूर्त, विधी आणि घटस्थापनाची सोपी पद्धत, पाहा Video

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read More