Surya Grahan 2025 : या वर्षातील तिसरा महिना मार्च महिन्याला सुरुवात झाली असून अवघ्या काही दिवसांवर होळीचा सण आला आहे. होळीच्या दिवशी या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण असणार आहे. त्यानंतर मराठी नवं वर्ष गुढीपाडव्याचा सण असणार आहे. गुढीपाडव्याच्या एका दिवसापूर्वी या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण हे अशुभ मानले जाते. अशात या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे काही राशींसाठी धोकादायक ठरणार आहे. गुढीपाडव्याचा सण 30 मार्च 2025 ला रविवारी असणार आहे. गुढीपाडव्याच्या आधल्या दिवशी शनिवारी 29 मार्च 2025 ला सूर्यग्रहण असणार आहे. 12 राशींपैकी काही राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहणामुळे नोकरी, करिअर आणि प्रेम जीवनात तणाव निर्माण होणार आहे. यात तुमची रास तर नाही ना जाणून घ्या. (Surya Grahan 2025 Will the solar eclipse before Gudi Padwa be dangerous for these zodiacs people Job career and love life will take a break)
या राशीच्या लोकांवर सूर्यग्रहणाचा प्रभाव दिसून येणार आहे. यामुळे मेष राशीच्या लोकांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागणरा आहे. करिअर आणि नोकरीमध्ये अनेक प्रकारच्या समस्या उद्भवणार आहेत. ज्यामुळे तुम्ही चिंतेत राहणार आहात. प्रेम जीवनात ब्रेकअप होण्याचे संकेत आहेत. तर विवाहित जोडप्यांमध्ये वाद होणार आहेत.
वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणानंतर कर्क राशीच्या लोकांना करिअर आणि नोकरीत आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. व्यावसायिकांचे पैसे कुठेतरी अडकणार आहे. ज्यामुळे तुम्ही काळजीत आणि तणावात असणार आहात. अनावश्यक खर्चापासून आणि कोणत्याही प्रकारच्या वादापासून स्वतःला दूर ठेवा. वैवाहिक जीवनात, तुमच्या जोडीदाराशी गोड बोलणे हिताचे ठरणार आहे.
वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणामुळे मीन राशीच्या लोकांना अडचणी येणार आहेत. या काळात, तुमचे मन शांत ठेवा. योग आणि ध्यानाची मदत तुम्हाला फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी बॉस आणि वरिष्ठांशी संबंध बिघडण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबाला वेळ द्या. लग्नाची तयारी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ कठीण असणार आहे. तुमच्या प्रेम जीवनात प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचला. कोणत्याही प्रकारची घाई करू नका.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)