Marathi News> भविष्य
Advertisement

Ramayan Katha : श्री राम आणि हनुमान यांच्यामध्ये झालं होतं 5 दिवसांचं युद्ध; या एका गोष्टीमुळे बजरंगबली जिंकले

Ramayan Katha : हनुमानजी हे भगवान रामाचे एक महान भक्त आहेत हे सर्वांना माहिती आहे. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, भगवान राम आणि हनुमानजी यांच्यामध्ये पाच दिवस युद्ध झाले होते. ज्यात हनुमानजीने श्री रामावर विजय मिळवला होता.   

Ramayan Katha : श्री राम आणि हनुमान यांच्यामध्ये झालं होतं 5 दिवसांचं युद्ध; या एका गोष्टीमुळे बजरंगबली जिंकले

Ram Hanuman Yudh : आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की, भगवान रामाच्या प्रेमात संपूर्ण शरीरावर सिंदूर लावणाऱ्या हनुमानजींपेक्षा भगवान रामाचा मोठा भक्त दुसरा कोणी नाही. हनुमानजींनी त्यांची छाती फाडून दाखवून दिले होते की त्यांच्या हृदयात फक्त भगवान रामच राहतात. त्याच वेळी, भगवान राम देखील हनुमानजींना आपला मुलगा मानतात. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटले की एकदा भगवान राम आणि हनुमानजी यांच्यात भयंकर युद्ध झालं होतं. 

श्रीराम आणि हनुमानजी केवळ एकमेकांविरुद्ध लढले नाहीत. खरं तर, त्यांच्यामध्ये 5 दिवस युद्ध झाले होते. आख्यायिकेनुसार, एकदा देवलोकात संतांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या सभेत विश्वातील सर्व तेजस्वी आणि ज्ञानी संत सहभागी झाले होते. त्यांच्यामध्ये एक संत होता जो एकेकाळी राजा होता. त्याचं नाव सुकांत होतं पण त्याने आपलं राज्य सोडून दिलं आणि तो संन्यासी बनला. जेव्हा तो संतांच्या त्या सभेत पोहोचला तेव्हा त्याने सर्व ऋषी-मुनींना नमस्कार केला पण ऋषी विश्वामित्रांना नमस्कार केला नाही. हे पाहून, ऋषी विश्वामित्र खूप दुःखी झाले आणि संत सभेतून निघून गेले. जेव्हा ऋषी विश्वामित्र अयोध्येला परतले आणि श्रीरामांना भेटले तेव्हा श्रीरामांनी त्यांना दुःखी पाहिले.

तेव्हा भगवान रामाने शपथ घेतली की...

जेव्हा भगवान रामांना याचं कारण कळलं तेव्हा त्यांनी शपथ घेतली की ऋषींचा अपमान केल्याच्या गुन्ह्यासाठी ते राजा सुकांतला मारतील. जेव्हा संत बनलेला राजा सुकांत यांना हे कळलं तेव्हा ते ताबडतोब हनुमानजींच्या आई अंजनीकडे गेले आणि त्यांच्या जीवाला धोका आहे अशी प्रार्थना केली. त्यांनी त्याच्या मुलाला त्याचे रक्षण करण्यास सांगितलं. भगवान रामाने राजा सुकांताला मारण्याची प्रतिज्ञा केली आहे हे नकळत आई अंजनीने हनुमानजींना राजा सुकांताचे रक्षण करण्याची आज्ञा दिली.

आई अंजनीच्या आज्ञेनुसार, हनुमानजींनी संत झालेल्या राजा सुकांतचे रक्षण करण्याचे वचन दिलं. आणि विचारले की त्याच्या जीवाला कोणापासून धोका आहे, तेव्हा राजा सुकांतने सांगितलं की भगवान श्रीरामच त्याला मारू इच्छित होते आणि त्याने संपूर्ण घटना हनुमानजींना सांगितली. कारण हनुमानजींनी रक्षण करण्याचे वचन दिलं होतं. म्हणून त्याला भगवान रामाशी युद्ध करावं लागलं.

हेसुद्धा वाचा - Ramayan Katha : लंकेत रावणाशी झालेल्या युद्धानंतर रामाची वानर सेना कुठे गेली? सुग्रीव, अंगद, नल आणि नील यांचं काय झालं?

हनुमानजी आणि श्रीराम यांच्यात 5 दिवस भयंकर युद्ध झालं. हनुमानजींनी रामाचं नाव घेऊन एक वर्तुळ तयार केला आणि राजा सुकांतला त्या वर्तुळात बसवलं. अशा परिस्थितीत, भगवान रामाने राजा सुकांतावर सोडलेले कोणतेही बाण 'रामनाम'च्या प्रभावामुळे निष्प्रभ ठरले. जेव्हा ऋषी विश्वामित्रांनी पाहिले की हनुमानजींची श्री रामांप्रती असलेली भक्ती इतकी दिव्य आहे की त्यांच्या नावासमोर भगवान रामाचे बाणही काम करत नाहीत, तेव्हा ऋषी विश्वामित्रांनी राजाला क्षमा केली आणि श्री रामांना युद्ध थांबवण्यास सांगितलं. म्हणूनच म्हणतात की - रामाचे नाव भगवान रामापेक्षा श्रेष्ठ आहे.

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.) 

Read More