Marathi News> भविष्य
Advertisement

Shukra-Shani yuti: 30 वर्षांनंतर कुंभ राशीत 2 ग्रहांचा होणार संयोग; मार्चमध्ये 'या' राशी होणार मालामाल

Conjunction Of Saturn Venus 2024: सध्या कर्माचा दाता शनिदेव कुंभ राशीत विराजमान आहे, तर शुक्र देखील मार्चमध्ये कुंभ राशीत गोचर करणार आहे. अशा स्थितीत 30 वर्षांनंतर कुंभ राशीमध्ये शुक्र आणि शनीचा संयोग होणार आहे.

Shukra-Shani yuti: 30 वर्षांनंतर कुंभ राशीत 2 ग्रहांचा होणार संयोग; मार्चमध्ये 'या' राशी होणार मालामाल

Conjunction Of Saturn Venus 2024: ज्योतिषशास्त्रात ग्रह, कुंडली आणि नक्षत्रांना खूप महत्त्व देण्यात आलं आहे. ज्यावेळी एखादा ग्रह ठराविक वेळेनंतर आपली हालचाल बदलतो तेव्हा त्याचा 12 राशींच्या व्यक्तींवर प्रभाव पडतो. या काळात दोन ग्रह एका राशीत आले तर ग्रहांचा संयोग तयार होतो. असंच येत्या काळाता मार्च महिन्यामध्ये कुंभ राशीत ग्रहांचा संयोग तयार होणार आहे.

सध्या कर्माचा दाता शनिदेव कुंभ राशीत विराजमान आहे, तर शुक्र देखील मार्चमध्ये कुंभ राशीत गोचर करणार आहे. अशा स्थितीत 30 वर्षांनंतर कुंभ राशीमध्ये शुक्र आणि शनीचा संयोग होणार आहे. या काळात शुक्र आणि शनीचा संयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना या काळात सकारात्मक परिणाम मिळणार आहेत.

सिंह रास

शुक्र आणि शनीचा संयोग या राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे नाते अधिक घट्ट होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. करिअरसाठी वेळ चांगला राहील, प्रमोशन मिळेल. जमिनीशी संबंधित कामांमध्ये मोठा आर्थिक लाभ होणार आहे. अविवाहित लोकांसाठी विवाहाची शक्यता आहे. 

मिथुन रास

शनि आणि शुक्राचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. करिअरच्या बाबतीत काही चांगली बातमी मिळू शकणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम राहणार आहे. तुम्हाला व्यवसायात प्रगती आणि नोकरीत बढती मिळू शकते. उत्पन्न वाढेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोतही निर्माण होतील. गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. शनीच्या कृपेने तुमचे नशीब उजळेल. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात.

वृश्चिक रास

शुक्र आणि शनिदेव यांचा युती तुम्हाला विशेष परिणाम देणार आहे. वाहन आणि मालमत्ता खरेदीची शक्यता आहे. सर्व सुखं प्राप्त होतील. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. दीर्घकाळ प्रलंबित आणि रखडलेल्या कामांना गती मिळेल. नोकरीत पदोन्नती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. कामं आणि योजनांमध्ये यश मिळेल.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि शनीचा योग अनुकूल ठरू शकणार आहे. नोकरी-व्यवसायात प्रगती होऊ शकते. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. बेरोजगारांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. व्यवसायाचा विस्तार करू शकणार आहात. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Read More