Marathi News> भविष्य
Advertisement

Rajyog 2024: नव्या वर्षी तयार होणार 'हे' खास राजयोग; 'या' राशींच्या घरी भरपूर पैसा येण्याची शक्यता

Rajyog 2024: ज्योतिष शास्त्रानुसार गुरु प्रत्यक्ष असल्यामुळे गजलक्ष्मी राजयोग आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार आहे. गजलक्ष्मी राजयोगाच्या निर्मितीमुळे धन आणि सुखात वाढ होते. याशिवाय नववर्षात केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार असून तो अत्यंत शुभ आहे.

Rajyog 2024: नव्या वर्षी तयार होणार 'हे' खास राजयोग; 'या' राशींच्या घरी भरपूर पैसा येण्याची शक्यता

Rajyog 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रह एका ठराविक काळानंतर राशीमध्ये बदल करतात. यावेळी शुभ आणि अशुभ राजयोग तयार करतात. ग्रहांच्या गोचरमुळे तयार झालेल्या राजयोगांचा परिणाम मानवी जीवनावर होणार आहे. 1 मे 2024 रोजी दुपारी गुरू मेष राशीतून बाहेर पडून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी 3 मे 2024 रोजी रात्री देव गुरु बृहस्पति देखील कर्क राशीत प्रवेश करणार आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार गुरु प्रत्यक्ष असल्यामुळे गजलक्ष्मी राजयोग आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार आहे. गजलक्ष्मी राजयोगाच्या निर्मितीमुळे धन आणि सुखात वाढ होते. याशिवाय नववर्षात केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार असून तो अत्यंत शुभ आहे. या काळात व्यक्तीला पैशाच्या गुंतवणुकीचे फायदे, आरोग्य लाभ आणि नोकरीत प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया नववर्षात तयार होणाऱ्या राजयोगांचा कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे. 

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी डिसेंबरमध्ये पाच राजयोग तयार होणं शुभ ठरणार आहे. मालव्य आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार असल्याने तुमचे करिअर आणि व्यवसाय विशेषत: वर्ष 2024 च्या सुरुवातीला चमकतील. तुमचं वैवाहिक जीवन सुखी होईल. तुमच्या मुलाच्या नोकरी किंवा लग्नाशी संबंधित काही चांगली बातमी मिळणार आहे. 

कर्क रास

बृहस्पति मार्गी असल्याने आणि गजलक्ष्मी राजयोग तयार होत असल्याने स्थानिकांसाठी खूप शुभ असणार आहे. व्यावसायिकांसाठी काळ अनुकूल राहील, आर्थिक लाभ होऊ शकतो. गुंतवणुकीतूनही नफा मिळण्याची शक्यता आहे. तर केंद्र त्रिकोण राजयोगामुळे काम आणि व्यवसायात यश मिळेल आणि चांगला नफा मिळेल. 

धनु रास

गजलक्ष्मी राजयोग लाभदायक ठरणार आहे. या काळात वाहन आणि मालमत्ता खरेदी करण्याची देखील शक्यता आहे. मालव्य आणि रुचिक राजयोगाच्या माध्यमातून तुम्हाला शुक्र आणि मंगळाचा आशीर्वाद मिळणार आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरीच्या ऑफर मिळतील. शनी आणि शुक्राचा नवपंचम योग तयार होत आहे, यासोबतच गुरू आणि शुक्राचा समसप्तक योगही तयार होत आहे. या काळात तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Read More