Marathi News> भविष्य
Advertisement

Chanakya Niti: घरात अशी स्थिती असल्यास समजून संकट ओढावणार, जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीति

चाणक्य नीतित यशस्वी जीवनाचे अनेक पैलू मांडले आहेत. आजही चाणक्य यांनी मांडलेली मत तंतोतंत लागू होतात.

Chanakya Niti: घरात अशी स्थिती असल्यास समजून संकट ओढावणार, जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीति

Chanakya Niti For Life: चाणक्य नीतित यशस्वी जीवनाचे अनेक पैलू मांडले आहेत. आजही चाणक्य यांनी मांडलेली मत तंतोतंत लागू होतात. चाणक्य यांनी नीतिशास्त्रात चांगल्या वाईट क्षणांपूर्वी काय संकेत मिळतात? याबाबतही नमूद केलं आहे. आर्थिक संकट येण्यापूर्वी घरात काही संकेत मिळू लागतात. या गोष्टींकडे कानाडोळा करू नका असं आचार्य चाणक्य यांनी सांगितलं आहे. चला तर जाणून घेऊयात काय सांगते चाणक्य नीति...

तुळसीचं रोप कोमजणं: घरातील अंगणात हिरवंगार तुलसीचं रोप अचानक सुकलं तर समजून जा की, एखादं संकट ओढावणार आहे. तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो किंना आर्थिक फटका बसू शकतो. यासाठी तात्काळ कोमजलेलं तुळसीचं रोप काढून नवं लावावं. तसेच तुळशीच्या रोपाची पूजा करून संकट टळण्यासाठी प्रार्थना करावी. 

घरात सततची भांडणे : घरात सतत भांडणे होत असतील तर ते शुभ लक्षण नाही. अशा घरात देवी लक्ष्मी कधीच वास करत नाही. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळून पूजा करावी.

दूध सांडणे किंवा ओतू जाणे: घरात दूध रोज सांडत असेल किंवा काच वारंवार फुटत असल्यास चांगलं लक्षण नाही. या गोष्टी वाईट संकट येण्याचे संकेत देतात. या बाबी आर्थिक अडचणीचे लक्षण आहे.

घरात शांत झोप न लागणे: घरातील लोकांना शांत झोप न लागणे हे देखील वाईट संकेत आहेत. वास्तूदोष आर्थिक संकटात आणू शकते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Read More