Negative Energy Signs : घरात सगळं सुरळीत वाटत असतं, पण अचानक खोलीतील बल्ब वारंवार चमकतो. आपल्या वाटतं की, हे बल्ब जाण्याचा चिन्ह आहे. किंवा घरातील एखादे झाडं खत - पाणी घालूनही कोमेजायला लागतं. हे फक्त योगायोग नाही तर वास्तूशास्त्रानुसार तुमच्या घरात नकारात्मक उर्जेचा प्रभाव असू शकतो. वास्तूशास्त्रानुसार नकारात्मक ऊर्जेमुळे मानसिक शांतीच नव्हे तर तुमच्या आरोग्यावर, नातेसंबंधांवर आणि अगदी तुमच्या आर्थिक गणितीवरही होतो. अशा परिस्थितीत तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला हे महागात पडू शकतात. वास्तूशास्त्रानुसार पाहूयात तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असल्यास कोणते संकेत दिसतात.
वास्तुशास्त्रात, वनस्पतींना जीवन आणि सकारात्मक उर्जेचे प्रतीक मानले गेले आहेत. जेव्हा घरातील झाडे कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय कोमेजून किंवा सुकू लागतात, तेव्हा ते घरात नकारात्मक ऊर्जाचा प्रभाव असल्याच संकेत आहे. घरातील कोणत्याही सदस्याबद्दल नकारात्मक विचार किंवा तणावपूर्ण वातावरण राहणार.
उपाय : तुळशी, मनी प्लांट आणि कोरफड यांसारखी सकारात्मक ऊर्जा देणारी झाडे ईशान्य किंवा पूर्व दिशेला लावा. वाळलेली किंवा मृत झाडे ताबडतोब काढून टाका. झाडांची नियमित काळजी घ्या, परंतु तरीही ती फुलली नाहीत तर ती वास्तुचा इशारा असू शकते.
अनेक लोकांचा असा विश्वास आहे की अचानक दिवे चमकणे किंवा दिवे लुकलुकणे हे अलौकिक शक्तींचे लक्षण आहे. पण वास्तुशास्त्रानुसार, हे तुमच्या घरात विद्युत ऊर्जा आणि मानसिक उर्जेच्या असंतुलनाचे सूचक मानले गेले आहे. घराच्या काही भागात सतत भांडणे किंवा नकारात्मक विचार राहणे.
उपाय : चमकणारे दिवे ताबडतोब बदला आणि वायरिंग तपासा. स्थिरता वाढवण्यासाठी जड वस्तू दक्षिण दिशेला ठेवा. घरात सुगंधित दिवे किंवा हिरवे दिवे वापरा, विशेषतः संध्याकाळी.
तुम्ही अलीकडेच खरेदी केलेले फ्रिज, टीव्ही किंवा वॉशिंग मशीन वारंवार खराब होत असल्याचे लक्षात आले आहे का? हे वास्तुदोषाशी संबंधित गोष्ट असू शकते असं तज्ज्ञ सांगतात.
उपाय : नेहमी ईशान्येकडील भाग स्वच्छ, प्रकाशमान आणि उघडा ठेवा. आग्नेय दिशेला आग्नेय दिशेला अग्नीशी संबंधित उपकरणे ठेवा. विद्युत उपकरणांजवळ मीठाने भरलेला वाटी ठेवा, तो नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो.
वास्तुशास्त्रात असे मानले गेले आहे की आपल्या घराची रचना आणि त्यात ठेवलेल्या वस्तू एकत्रितपणे एक विशेष ऊर्जा तयार करत असतात. जेव्हा ही ऊर्जा असंतुलित होते तेव्हा त्याचा परिणाम प्रथम आपल्या सभोवतालच्या निसर्गावर दिसून येतो. उदाहरणात जसे की वनस्पती, प्राणी आणि उपकरणे यावर त्या नकारात्मक उर्जा प्रभाव मिळतो. घरात वारंवार दुरुस्तीचं काम निघणे. सदस्य वारंवार आजारी पडणे किंवा पैशाचा अभाव, तणाव आणि नात्यांमध्ये दुरावा, हे नकारात्क ऊर्जा असल्यास घरात दिसतात.
वास्तुदोष दूर करण्यासाठी काही उपाय खूप प्रभावी मानले जातात. वास्तूशास्त्र तज्ज्ञ म्हणाले की,
पंचतत्व संतुलन : घरातील माती (माती), पाणी (पाण्याचे भांडे), अग्नी (दिवा), हवा (खिडक्या उघड्या ठेवा) आणि आकाश (स्वच्छ छप्पर) यांचे संतुलन राखणे गरजे आहे.
स्वस्तिक आणि ओम : मुख्य दारावर स्वस्तिक किंवा 'ओम' चे चिन्ह लावा.
ही गोष्ट टाळा : घरात अनावश्यक वस्तू ठेवू नका, ते ऊर्जा रोखते.
समग्र स्वच्छता : मिठाच्या पाण्याने पुसून टाका, ते नकारात्मक ऊर्जा काढून टाकते.
आवाज आणि वास : नियमित घंटा, शंख किंवा सुगंधित उदबत्तीने घराची ऊर्जा शुद्ध करा.
जर तुम्ही सर्व उपाय करून पाहिले असतील आणि तरीही समस्या कायम दिसत असेल तर वास्तु तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ते घराच्या दिशानिर्देश, चुंबकीय क्षेत्र आणि ऊर्जा प्रवाहाचे सखोल विश्लेषण करून उपाय देऊ शकतात.
(Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)