Marathi News> भविष्य
Advertisement

आजचे राशीभविष्य | गुरुवार | ११ जुलै २०१९

जाणून घ्या कसा आहे तुमचा आजचा दिवस 

आजचे राशीभविष्य | गुरुवार | ११ जुलै २०१९

मेष- आज कोणतंही काम टाळू नका. नोकरी आणि व्यापारामध्ये लक्ष्य निर्धारित करण्यावर भर द्या. एकाग्रतेने काम करा. नव्या व्यक्ती आणि मित्र भेटण्याची, नव्या ओळखी होण्याची संधी आहे. कुटुंबातील व्यक्ती तुमच्यासोबत काही गोष्टींचे बेत आखू शकतात. कुटुंबाच्या मदतीने आर्थिक परिस्थिती सुधारेल. 

वृषभ- काही नव्या संधी मिळण्याचे संकेत आहेत. तुम्ही आखलेल्या बेतांना इतरांचा दुजोरा मिळेल. व्यापारात यशस्वी होण्याच्यी शक्यता आहे. प्रेमाच्या नात्यात साथीदाराविषयीची जबाबदारी वाढेल. नव्या लोकांना भेटण्याची संधी मिळेल. 

मिथुन- नवा व्यापार, नोकरीचे प्रस्ताव मिळतील. विचाराधीन कामं पूर्ण होतील. कोणा एका नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी चांगली वेळ आहे. हळुहळू यश मिळेल. जुने बेत पुन्हा मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. स्वत:ची काळजी घ्या. तेच कराल जे तुमच्या मनात असेल. 

कर्क- जुन्या कामांचा फायदा होईल. अचानक एखादा जुमा मित्र मदत करेल. धार्मिक यात्रेला जाण्याची इच्छा होईल. खास आणि तितकीच महत्त्वाची कामं पूर्ण करा. मेहनत कमी पडेल. एखाद्या समस्येवर जवळच्या व्यक्तीची मदत मिळेल. प्रत्येक प्रयत्नांत साथीदाराची मदत होईल. 

सिंह- बुद्धीचातुर्याच्या बळावर सर्व गोष्टी निभावून नेण्याचा प्रयत्म कराल. पुढे जाण्याच्या चांगल्या संधी आहेत. जी कामं कराल त्यात वाढीव जबाबदारी मिळेल. इतर व्यक्ती त्यांच्या अडचणी तुमच्यासमोर ठेवतील. 

कन्या- इतरांना तुमची मतं पटतील. कुटुंबातील एखाद्या महत्त्वाच्या विषयावर तुम्ही सल्ला द्याल. एखाद्या बाबतील तुमची विचारसरणी बदलेल. लग्नाचे प्रस्ताव येतील. व्यापारात काही बदल करण्याची इच्छा होईल. 

तुळ- व्यग्र राहाल. शांततेने काम करा. इतरांचं गांभीर्याने ऐकाल. इतर व्यक्ती तुमचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतील. कागदोपत्री कामांवर लक्ष द्या. कामं पूर्णत्वास जातील. काही जबाबदाऱ्या वाढतील. 

वृश्चिक- एखाद्या प्रकरणावर तोडगा काढाल. जुन्या गोष्टींना मागे टाकत पुढे जाण्याचा प्रयत्न कराल. एखादी अशी परिस्थिती उदभवेल ज्यामुळे तुमच्या विचारसरणीत बदल होईल. दिवस सकारात्मक आहे. 

धनु- खास मित्राची मदत मिळेल. महत्त्वाच्या व्यक्तीशी संवाद साधण्याची संधी मिळेल. याचा फायद्या घ्या. दिनचर्येत काही बदलही करावे लागतील. मित्रमंडळींसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत कराल. साथीदारासोबतचे संबंध सुधारतील. 

मकर- दिवस चांगला आहे. आज जास्तीत जास्त समस्यांवर तोडगा निघेल. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच अंशी यशस्वी ठराल. आर्थिक परिस्थितीचा गांभीर्याने विचार करा. अडचणीच्या समस्यांवर जवळच्या व्यक्तींशी संवाद साधून तोडगा काढाल. पैशांच्या बाबतील काही नव्या संधी मिळतील. जुन्या गोष्टी आठवतील. 

कुंभ- एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल. वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. विचारपूर्वकपणे काम करा. कामाप्रती एकाग्रता खंडित होऊन देऊ नका. तयार राहा. कुटुंबाची मदत मिळेल. प्रवासयोग आहे. एखाद्या जुन्या वादावर तोडगा निघू शकेल. 

मीन- जास्तीत जास्त कामं पूर्ण होतील. फायदा मिळेल. मित्रांसोबत एखादा बेत आखाल. आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न कराल. व्यापाराच्या नव्या संधी मिळतील. अनुभवी व्यक्तींचा सल्ला फायद्याचा ठरेल. 

Read More