Marathi News> भविष्य
Advertisement

आजचे राशीभविष्य | गुरुवार | १८ जुलै २०१९

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस 

आजचे राशीभविष्य | गुरुवार | १८ जुलै २०१९

मेष- बेरोजगारांसाठी आजचा दिवस चांगला आहे. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी आहेत. आत्मविश्वासाच्या बळावर अनेक कामांमध्ये यशस्वी ठराल. कौटुंबीक नात्यांमध्ये सुधारणा होतील. 

वृषभ- आज बरंच काम करावं लागेल. काही व्यक्ती तुम्याकडून काम काढून घेण्याचा प्रयत्न करतील. सावध राहा. जास्त विचार करु नका. मनातल्या सर्व गोष्टी साथीदाराला सांगा. शारीरिक व्याधी दूर होतील. 

मिथुन- व्यवसाय आणि नोकरीच्या बाबतीत कुटुंबाचं सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वकपणे बोला. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. विश्वासार्ह व्यक्तीची मदत मिळेल. भावनांचा आदर करा. आरोग्याची विशेष काळजी घ्या. 

कर्क- नव्या व्यवसायाकडे आकर्षिले जाऊ शकता. नोकरीत काही बदल करण्याची इच्छा होईल. अर्थार्जनात वाढ होईल. एखादा जुना बेत आठवेल. जुन्या व्याधी दूर होतील. नवी कामं करण्याची इच्छा होईल. 

सिंह- व्यापाराचे नवे बेत आखाल. अडकलेले पैसे परत मिळण्याचा योग आहे. पैसे उधार घ्यावे लागतील. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. कामाच्या निमित्ताने प्रवास करण्याचा योग आहे. साथीदाराचं सहकार्य मिळेल. तुमची इच्छा पूर्ण होईल. विवाहप्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. 

कन्या- नोकरी आणि व्यवसायामध्ये भावनांच्या भरात कोणताही निर्णय़ घेऊ नका. वादाच्या भोवऱ्यात अडकू नका. जुने वाद समोर येतील. कुटुंबाच्या काही समस्या वाढतील. मानसिक आजार वाढतील. जवळच्या नातेसंबंधांमध्ये आणखीही काही उलटफेर होण्याची शक्यता आहे. 

तुळ- कर्जापासून मुक्ती मिळेल. कामावर पूर्ण लक्ष ठेवा. अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. एखादा बेत आखणं मेहनत करण्यापेक्षाही जास्त फायद्याचं ठरेल. चांगलं, नवं आणि सकारात्मक काम कराल तर, जीवनात चांगल्या गोष्टी घडतील. 

वृश्चिक- व्यवसाय चांगला चालेल. एखादं खास काम पूर्ण होईल. तुमचं आरोग्य चांगलं असेल. ऐशोआरामाच्या सुखसुविधांवर जास्त भर असेल. आरोग्यात सुधारणा होईल. जमीन खरेदीचा विचार कराल. गुंतवणूकीचे बेत आखाल. 

धनु- नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता आहे. स्वत:च्या व्यवसायावर पूर्ण लक्ष द्या. व्यापार आणि नोकरीशी संबंधीत अडचणी दूर होतील. घर, ऑफिस अशा ठिकाणी अनुकूल वातावरण असेल. 

मकर- आर्थिक परिस्थिती सुधारेल. नव्या ओळखींचा फायदा होईल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. चमचमीत जेवणामुळे त्रास होईल. आरोग्याची काळजी घ्या. 

मकर- आर्थिक परिस्थिती सुधारेल. नव्या संपर्कांचा फायदा होईल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. प्रेमसंबंधांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आरोग्याची काळजी घ्या. 

कुंभ- व्यवसायामुळे आत्मनिर्भर असाल. नव्या लोकांच्या संपर्कात याल. काम वाढेल. सोबतच्यांची साथ मिळेल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. विचाराधीन कामं पूर्ण होतील. जुन्या समस्यांवर तोडगा निघेल. 

मीन- आज तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. अनियमित दिनचर्येमुळे आळस येईल. आत्मविश्वासावरही नियंत्रण ठेवा. अतिउत्साहात नवी गुंतवणूक करु नका. कामाचा व्याप वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. 

Read More