Marathi News> भविष्य
Advertisement

आजचे राशीभविष्य | बुधवार | ३१ जुलै २०१९

असा असेल तुमचा आजचा दिवस... 

आजचे राशीभविष्य | बुधवार | ३१ जुलै २०१९

मेष- कामाच्या ठिकाणी एखादी वाढीव जबाबदारी मिळेल. दिवसभर व्यग्र असाल. अनेक अंशी यशस्वी ठराल. नोकरीच्या ठिकाणी शांतता असेल. प्रवासयोग आहेत. अडचणींशी दोन हात करण्याचे बेत आखाल. 

वृषभ- जुन्या अडचणी दूर होतील. स्वत:ची काळजी घ्या. नव्या कपड्यांची खरेदी कराल. समाज आणि कुटुंब अशा दोन्ही ठिकाणी कामं पूर्णत्वास न्याल. मिळकत आणि खर्चांवर लक्ष द्या. यशस्वी होण्यासाठी धीर बाळगा. मित्रांची मदत मिळेल. 

मिथुन- धनलाभ होण्याची शक्यता आहे. अनेक गोष्टींचे बेत आखाल. अविवाहितांचं लग्न ठरण्याची चिन्हं आहेत. आज तुम्ही स्वत:ला सिद्ध कराल. एखादी शुभवार्ता कळेल. बेरोजगारांसाठी आज चांगला दिवस आहे. नव्या संधी मिळू शकतात. 

कर्क- अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. आर्थिक व्यवहार सुधारतील. अडचणींवर तोडगा काढण्यासाठी मित्रांची मदत होईल. एखाद्या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न कराल. व्यवहारकौशल्य आणि सहनशक्तीने वागा, अनेक गोष्टींवर तोडगा निघेल. 

सिंह- आर्थिक परिस्थिती सुधारेल. दिवस आनंददायी असेल. तुमच्या अपेक्षांवर ताबा ठेवा. व्यापार किंवा नोकरीच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. वरिष्ठांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी ठराल. कामाच्या ठिकाणी असणारी तणावपूर्ण परिस्थिती निकाली निघेल. मेहनतीच्या बळावर काही कठिण कामं पूर्ण कराल. 

कन्या- नोकरीमध्ये एखादं नवं पाऊल उचलाल. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. विचाराधीन कामं पूर्ण होतील. कौटुंबीक समस्यांवर तोडगा निघेल. 

तुळ- विचाराधीन कामं पूर्णत्वास नेण्याची सुरुवात होईल. कुटुंबाच्या जास्तीत जास्त जबाबदाऱ्या तुमच्यावरच असतील. एखाद्या गुंतवणूकीचा बेत आखाल. नोकरी किंवा व्यवसायाच्या बाबतीत मोठा निर्णय घेऊ शकता. 


वृश्चिक- आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. सामूहिक आणि सामाजिक कामांमध्ये व्यग्र असाल. कुटुंबाची जास्तीत जास्त कामं तुम्ही पूर्ण करु शकता. धनलाभ होण्याची शक्यता आहे. 

धनु- नोकरीच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता आहे. तुमचा उत्साह आज शिगेला असेल. आज काही नव्या लोकांशी संपर्क साधण्याची चिन्हं आहेत. कामाच्या ठिकाणी इतरांची सहज सहमती मिळेल. तुमच्या मदतीसाठी अनेकजण तयार असतील. 

मकर- एखादं फायद्याचं असं मोठं काम पूर्ण कराल. एखादं जुनं काम पूर्ण करण्याचा तुम्हाला फायदा होईल. नव्या कामांची सुरुवात करण्याऐवजी जुनी आणि अर्धवट कामं पूर्ण करा. 

कुंभ- आज धाडसाने काम करा. दिवसभर पैशांचाच विचार कराल. जमीन आणि संपत्तीच्या बाबतील धनलाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या नव्या कामाची कल्पना मनात असेल तर असंच एखादं काम समोर येईल. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीचा विचार कराल. आरोग्याची चिंता कमी होईल. 

मीन- आज जी कामं कराल, त्याचा फायदाच होणार आहे. मनात अनेक विचार घर करतील. यावर तातडीने विचार करा. आज कायगोपत्री व्यवहार पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करा. फिरायला जाण्याचे बेत आखाल. 

Read More