Marathi News> भविष्य
Advertisement

राशीभविष्य : पाहा चंद्रग्रहणाचा कोणत्या राशीवर होणार कसा परिणाम?

या राशीला फळणार चंद्रगहण   

राशीभविष्य : पाहा चंद्रग्रहणाचा कोणत्या राशीवर होणार कसा परिणाम?

मेष-  चंद्रग्रहणामुळं या राशीच्या व्यक्तींच्या मनात काही नकारात्मक भावना घर करतील. या ग्रहणाच्या प्रभावापासून वाचण्यासाठी हनुमान चालीसा पठण करा. कार्यालयीन कामांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याचा प्रयत्न आणि विचार करा. अधिकाधिक कामं पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल कराल.  

वृषभ- आर्थिक परिस्थितीविषयी चिंतातूर असाल. वैवाहिक आयुष्यात काही अडचणी येतील. अनेकांचं सहकार्य मिळेल. कामात याचा फायदा होणार आहे. 

मिथुन- चंद्रग्रहण या राशीच्या व्यक्तींना काहीसं अडचणीत आणू शकतं. एकाच वेळी तुम्ही काही योजना आखाल. आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवा. मनापासून निर्णय घ्या.  

कर्क- आजच्या दिवशी ग्रहणाचा प्रभाव पाहता स्वत:च्या आशावादी दृष्टीकोनावर विश्वास ठेवा. आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही यशस्वी होणार आहात. दैनंदिन कामं पूर्णत्वास जातील.

सिंह- इतरांशी संवाद साधण्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. अगदी सहजपणे यश मिळणार आहे. कोणत्याही गोष्टीसाठी वेळ द्या. 

कन्या- कोणत्याही परिस्थितीमध्ये घाबरण्याची गरज नाही. कोणाचाही सल्ला फायद्याचा ठरणार आहे. पुढे जाण्यच्या नव्या संधी तुम्हाला मिळतील. 

तुळ- एखादी शुभवार्ता कळणार आहे. प्रयत्न करा, जीवनात सकारात्मक बदल होणार आहेत. काही चांगल्या व्यक्तिंना भेटण्याची संधी मिळेल. 

वृश्चिक- चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर मन चंचल असेल. अदिकाधिक कामं पूर्ण होतील. भावनांवर ताबा ठेवा. 

धनु- कुटुंबाची साथ लाभणार आहे. साथीदाराची साथ लाभणार आहे. जुनी कामं मार्गी लावा. धनलाभ होणार आहे. 

मकर- एखादी मोठी योजऩा आखत असाल तर त्यात काही महत्त्वाचे बदल करावे लागतील. जुनी कामं पूर्ण करा. दिवस आनंददायी असेल. 

 

कुंभ- मित्रांशी असणारं नातं आणखी दृढ होईल. दिवस सकारात्मक आहे. नवे विचार फायद्याचे ठरतील. जुने वाद मिटतील. 

मीन- संपत्तीचे वाद मिटतील. धनलाभ होणार आहे. शांत स्वभाव फायद्याचा ठरेल. परिस्थइतीचा चौफेर विचार करा.  

Read More