Marathi News> भविष्य
Advertisement

Panchang, 27 April 2023 : आज गुरु पुष्य, सर्वार्थ सिद्धीसह तीन योगांचं महामिलन; पाहून घ्या आजचे अद्वीतीय मुहूर्त

Panchang, 27 April 2023 : तिथी आणि एकंदर पंचांगानुसार आजचा दिवस अतिशय शुभ असून, या दिवशी तुम्ही बऱ्याच चांगल्या गोष्टींचा निर्धारही करु शकता. ज्योतिषविद्येनुसार काय आहे आजच्या दिवसाचं महत्त्वं? जाणून घेऊया   

Panchang, 27 April 2023 : आज गुरु पुष्य, सर्वार्थ सिद्धीसह तीन योगांचं महामिलन; पाहून घ्या आजचे अद्वीतीय मुहूर्त

Panchang, 27 april 2023 : आज गुरुवार. ज्योतिषविद्येच्या दृष्टीनं आजचा दिवस म्हणजे सर्वोत्तम योगांचा दिवस. महिन्याच्या शेवटी साधून आलेले हे योग एका नव्या सुरुवातीच्या दिशेनं तुम्हाला नेणार आहेत. आज, शुक्ल पक्षातील सप्तमी आणि सोबतच अमृत सिद्धी, गुरु पुष्य, सर्वार्थ सिद्धी अशा तीन योगांचं महामिलन. 

पंचांगामध्ये रवि योग, ब्रम्‍ह मुहूर्त, अभिजीत मुहूर्त, विजय महूर्त, गोधूलि मुहूर्त आणि अमृत काळ हे मुहूर्त पाहूनच शुभकार्य सिद्धीस नेण्याचा निर्णय घ्यावा. यातही सर्वार्थ सिद्धी, रवी आणि पुष्कर हे योग अतीव महत्त्वाचे आणि फलदायी. सोबतच पंचांग पाहताना काही अशुभ काळही अंदाजात घेणं महत्त्वाचं. या साऱ्याची सोप्या सोपी कल्पना ही पंचांग तुम्हाला देतं. जिथं एका क्लिकवर तुम्हाला बरीच माहिती मिळते. चला तर मग, आजच्या या शुभदिनी पाहून घेऊया आजचं पंचांग.... (todays Panchang 27 april 2023 thursday astro news )

आजचा वार - गुरुवार 
तिथी- सप्तमी
नक्षत्र - पुनर्वसू  
योग - धृती
करण- वाणिज, विष्टी 

हेसुद्धा वाचा : Horoscope 27 April 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींना भविष्यात होणाऱ्या फायद्यांचे संकेत मिळतील!

 

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय - सकाळी 05.47 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 06:51 वाजता
चंद्रोदय -  रात्री 08:31 वाजता 
चंद्रास्त - 23.14
चंद्र रास- वृषभ 

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त– 10:07:29 पासुन 11:00:06 पर्यंत, 15:23:11 पासुन 16:15:48 पर्यंत
कुलिक– 10:07:29 पासुन 11:00:06 पर्यंत
कंटक– 15:23:11 पासुन 16:15:48 पर्यंत
राहु काळ– 13:57:41 पासुन 15:36:21 पर्यंत
कालवेला/अर्द्धयाम– 17:08:25 पासुन 18:01:02 पर्यंत
यमघण्ट– 06:37:01 पासुन 07:29:38 पर्यंत
यमगण्ड– 05:44:24 पासुन 07:23:03 पर्यंत
गुलिक काळ– 09:01:43 पासुन 10:40:22 पर्यंत

शुभ काळ 

अभिजीत मुहूर्त - 11:52:43 पासुन 12:45:20 पर्यंत
अमृत काळ - दुपारी 02:43 ते पहाटे 04:30 पर्यंत
विजय मुहूर्त - दुपारी 02:31 ते पहाटे 03:23 पर्यंत
निशीता मुहूर्त - दुपारी 11:57 12:40 पर्यंत


चंद्रबल- वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ

ताराबल - पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती, भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.) 

Read More