Marathi News> भविष्य
Advertisement

Surya Mangal Yuti: मित्र ग्रह सूर्य-मंगळाची होणार युती; 'या' राशींना होऊ शकतो धनलाभ

Sun Mars Conjunction In Capricorn 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, शनीच्या राशीमध्ये सूर्य आणि मंगळाचा संयोग अनेक राशींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकणार आहे. सूर्य आणि मंगळाच्या यांचा संयोग कोणत्या राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे, ते पाहुयात.

Surya Mangal Yuti: मित्र ग्रह सूर्य-मंगळाची होणार युती; 'या' राशींना होऊ शकतो धनलाभ

Sun Mars Conjunction In Capricorn 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ आणि ग्रहांचा राजा सूर्य धनु राशीत स्थित आहे. येत्या 15 जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. तर मंगळ 5 फेब्रुवारी 2024 रोजी मकर राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे हा शुभ संयोग पुन्हा शनीच्या राशीत होत आहे. 

ज्योतिषशास्त्रानुसार, शनीच्या राशीमध्ये सूर्य आणि मंगळाचा संयोग अनेक राशींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकणार आहे. सूर्य आणि मंगळाच्या यांचा संयोग कोणत्या राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे, ते पाहुयात.

मेष रास

मंगळ आणि सूर्याचा संयोग दशम भावात होणार आहे. प्रत्येक क्षेत्रात यश मिळाल्यास अमाप संपत्ती मिळेल. नोकरदारांना आता त्यांच्या कामाचे फळ मिळेल. तुम्हाला परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. व्यवसायातही भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमचा तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. पैशांची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल.

वृषभ रास

मंगळ आणि सूर्याचा संयोगामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. नवव्या घरात मंगळ असल्याने अध्यात्माकडे अधिक कल राहील. यासोबतच तुम्हाला तुमच्या वडिलांची साथ मिळणार आहे. सहलीला जाणं देखील फायदेशीर ठरणार आहे. मित्रांसोबत तुमचा वेळ चांगला जाणार आहे. व्यवसायातही तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. भागीदारीत केलेले व्यवसायही यशस्वी होणार आहेत. 

सिंह रास

सूर्य-मंगळाच्या युतीने या राशीच्या लोकांना अधिक यश मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळण्याची दाट शक्यता असते. वरिष्ठांमध्ये तुमचा आदर वाढेल. तुम्हाला व्यवसायातही यश मिळेल. तुमच्या जोडीदारासोबत चांगला समन्वय निर्माण होईल. तुम्ही कोणतीही गुंतवणूक कराल तर तुम्हाला भविष्यात फायदा होईल. या काळात तुमचे धैर्य आणि शौर्यही वाढेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read More