Marathi News> भविष्य
Advertisement

Vakri Guru : 4 सप्टेंबरपासून होणार मोठा बदल; गुरुची उल्टी चाल 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार

Vakri Guru 2023 in Mesh: येत्या 4 सप्टेंबर 2023 रोजी गुरु वक्री होणार आहेत. गुरू सध्या मेष राशीत असून पुढील महिन्यापासून गुरू ग्रह उलट दिशेने जाणार आहे. देवगुरु बृहस्पतीच्या हालचालीतील हा बदल काही राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरणार आहे. 

Vakri Guru : 4 सप्टेंबरपासून होणार मोठा बदल; गुरुची उल्टी चाल 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार

Vakri Guru 2023 in Mesh: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो. ग्रहाच्या या बदलाच्या स्थितीला गोचर असं म्हटलं जातं. येत्या 4 सप्टेंबर 2023 रोजी गुरु वक्री होणार आहेत. गुरू सध्या मेष राशीत असून पुढील महिन्यापासून गुरू ग्रह उलट दिशेने जाणार आहे. 

गुरु ग्रहाला आनंद, नशीब, समृद्धी आणि विवाहाचा कारक मानलं जातं. त्यामुळे 4 सप्टेंबर रोजी होणारी गुरुची वक्री चाल सर्व 12 राशींच्या जीवनावर मोठा परिणाम टाकणार आहे. देवगुरु बृहस्पतीच्या हालचालीतील हा बदल काही राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरणार आहे. जाणून घेऊया गुरुची वक्री चाल कोणत्या राशीच्या व्यक्तींसाठी उत्तम असणार आहे. 

वक्री गुरु बदलणार या राशींचं नशीब

मेष रास

मेष राशीच्या लोकांना वक्री गुरु 4 सप्टेंबरपासून भरपूर लाभ देणार आहे. विशेषत: शैक्षणिक क्षेत्राशी निगडित लोकांसाठी हा काळ खूप यश देणार आहे. तुमच्या कुटुंबात सुसंवाद वाढण्याची शक्यता आहे. या राशीच्या व्यक्तींना प्रसिद्धी आणि सन्मान मिळणार आहे. त्याचसोबत धन आणि लाभ देखील मिळणार आहे. नोकरदार लोकांना करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात.

मिथुन रास

गुरूची वक्री चाल मिथुन राशीच्या लोकांना लाभ देणार आहे. या लोकांना गुंतवणुकीचा फायदा होणार आहे. या काळात रखडलेल्या कामात यश मिळेल. अचानक तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून धनलाभ होणार आहे. करिअरमध्ये प्रगतीचा मार्ग खुला होईल. जे व्यावसायिक आहेत त्यांच्या व्यवसायात वाढ होण्याची चिन्हे आहेत. 

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी बृहस्पति ग्रहाची वक्री चाल चांगला पैसा घेऊन येणार आहे. या काळात तुम्हाला भरपूर पैसे मिळण्याची शक्यता आहे. कर्जबाजारी लोकांना कर्जमुक्ती मिळेल. नोकरी-व्यवसायात लाभ होणार आहे. शेअर मार्केट, सट्टेबाजी आणि लॉटरीमध्ये नफा होऊ शकतो.

धनु रास

गुरु ग्रहाची वक्री गती धनु राशीच्या लोकांच्या जीवनात खूप आनंद घेऊन येणार आहे. या लोकांच्या आयुष्यात चांगले दिवस सुरू होणार आहेत. त्याचबरोबर कोर्ट-कचेरी प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. या काळात तुम्हाला अडकलेले पैसे मिळू शकतात. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढणार आहे.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Read More