Eating Vastu Tips : ज्योतिषशास्त्रानुसार वास्तूशास्त्र एक शास्त्र आहे, जे तुम्हाला दैनंदिन जीवनातील गोष्टीसंदर्भात नियम सांगतात. शिवाय वास्तूशास्त्रात घरातील रचनेबद्दल सांगितलं जातं. ज्यामुळे आपल्याला आर्थिक संकट, आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. वास्तूशास्त्र हे दिशेवर अवलंबून असतं. त्यानुसार चुकीच्या दिशेला चुकीचा गोष्टी केल्यास आपल्या जीवनात अनेक संकट येऊ शकतात. आज आपण जेवण्यासंदर्भातील नियम जाणून घेणार आहोत. भारतीय संस्कृती आणि वास्तुशास्त्रात, खाणे हे एक अतिशय पवित्र आणि ऊर्जा देणारे कार्य मानलं गेलं आहे. अन्न हे केवळ पोट भरण्यासाठी नाही तर ते शरीर, मन आणि आत्म्याचे पोषण करण्यासाठी महत्त्वाचे आहे. या कारणास्तव, असेही मानलं जातं की जेवताना केवळ अन्नाची गुणवत्ताच नाही तर बसण्याची दिशा आणि वातावरण देखील महत्त्वाची असते.
वास्तूशास्त्रानुसार दक्षिणेकडे तोंड करुन जेवणे हे अतिशय अशुभ मानले जाते. यामुळे केवळ मानसिक शांतीच बिघडत नाही तर रोगांनाही आमंत्रण मिळू शकते. दक्षिणेकडे तोंड करून अन्न खाणे का योग्य नाही. त्यामुळे ते टाळण्यासाठी काय कराला हवं ते जाणून घ्या. वास्तूशास्त्रानुसार दक्षिण दिशेला पितृलोकाची दिशा म्हणतात. ही दिशा मृत आत्म्यांची आणि पूर्वजांची मानली जाते. दक्षिणेकडे तोंड करून जेवण करणे म्हणजे मृत आत्म्यांना अन्न अर्पण केल्यासारखे मानलं गेलं आहे.
नकारात्मक उर्जेचा परिणाम
दक्षिण दिशेकडून येणाऱ्या चुंबकीय लहरी आणि पृथ्वीच्या चक्रांची दिशा एकत्रितपणे एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण करतात, ज्याचा पचन आणि मानसिक स्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
रोगांना आमंत्रण
आयुर्वेदानुसार, जेवताना दक्षिण दिशेकडून शरीराला आवश्यक असलेली सकारात्मक ऊर्जा मिळत नाही. यामुळे शरीरात वात-पित्त-कफ असंतुलन निर्माण होऊ शकते, ज्यामुळे पुढे विविध आजार होतात.
वाद आणि भांडणे
असे मानले जाते की जर एखादी व्यक्ती वारंवार दक्षिणेकडे तोंड करून जेवत असेल तर त्याच्या आयुष्यात परस्पर मतभेद, भांडणे आणि वाद वाढू शकतात.
पैशाचे नुकसान आणि मानसिक असंतुलन
असेही आढळून आले आहे की, या दिशेने जेवल्याने निर्णय घेण्याची शक्ती कमी होते आणि कामात अडथळे निर्माण होतात. यामुळे व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात अपयशाची शक्यता वाढते.
दक्षिण दिशेशी संबंधित वास्तू नियम धार्मिक दृष्टिकोनातून सांगितलं असलं तरी त्यामागे वैज्ञानिक कारणेदेखील आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार पृथ्वीचा चुंबकीय उत्तर-दक्षिण ध्रुव आपल्या शरीराच्या जैवचुंबकीय क्षेत्रावर परिणाम करतो. दक्षिण दिशेला बसून जेवल्याने शरीराची ऊर्जा दक्षिण दिशेकडे खेचली जाते, ज्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो.
त्याशिवाय जेवताना, पूर्वेकडून किंवा उत्तर दिशेकडून येणाऱ्या सूर्यप्रकाशाचा डोळ्यांवर आणि मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो, तर दक्षिण दिशेकडून येणाऱ्या तीव्र प्रकाशामुळे मानसिक चिडचिड वाढू शकते.
वास्तुशास्त्र आणि आयुर्वेद दोन्ही मान्य करतात की जेवताना आपण ज्या दिशेला तोंड करतो त्याचा आपल्या उर्जेवर, पचनशक्तीवर आणि मानसिक स्थितीवर खोलवर परिणाम होत असतो. वास्तुशास्त्रानुसार, पूर्व दिशा सर्वात शुभ मानली जाते कारण ती सकारात्मक ऊर्जा प्रदान करते, पचन सुधारते आणि दीर्घायुष्यात मदत करते. उत्तर दिशा देखील फायदेशीर मानली गेली आहे. कारण ती मानसिक स्पष्टता आणि एकाग्रता वाढवतं. तसंच तुमच्या संपत्ती वाढवते. दुसरीकडे, पश्चिम दिशा तटस्थ मानली जाते. ती कोणताही विशेष फायदा देत नाही किंवा कोणतेही विशेष नुकसान करत नाही. पण वास्तुमध्ये दक्षिण दिशा सर्वात अशुभ मानली जाते. या दिशेला जेवण केल्याने नकारात्मक उर्जेचा प्रभाव वाढतो. ज्यामुळे रोग, मानसिक ताण, वाद आणि दुर्दैव जीवनात प्रवेश करू शकतात. म्हणून, जेवताना दिशा काळजीपूर्वक निवडली गेली पाहिजे.
पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेला तोंड करून जेवा.
पूर्वेकडे तोंड करून जेवल्याने वय, ऊर्जा आणि पचनशक्ती वाढते. उत्तर दिशेला बसल्याने संपत्ती आणि बुद्धिमत्ता वाढते.
मोबाईल, टीव्ही किंवा संभाषण टाळा
मन शांत ठेवा आणि कृतज्ञतेने जेवा
जेवण्यापूर्वी हात आणि पाय धुण्यास विसरू नका
थोडे पाणी प्या आणि जेवणानंतर 100 पावले चालत जा
जर जागेची कमतरता असेल आणि दक्षिण दिशा अटळ असेल तर
दिशेचा परिणाम पडदा किंवा आरशाने तोडू शकतो
जेवणापूर्वी "ओम अन्नपूर्णाय नम:" हा मंत्र जप करा
काळे किंवा लाल कपडे घालून जेवू नका
(Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)