Marathi News> भविष्य
Advertisement

Vasu Baras 2023: काय आहे वसुबारसला गाईंना नैवेद्य दाखवण्याचं कारण... जाणून घ्या गवारीची-भाजी आणि भाकरी खाण्याचे महत्त्व

गोवत्स द्वादशी हा एक पवित्र हिंदू सण आहे. ज्यादिवशी आपण गायी आणि वासरांची पूजा करतो आणि त्यांच्या प्रति आपले आभार व्यक्त करतो. गोवत्स द्वादशी म्हणजे संस्कृतमध्ये बारा असे होते आणि कृष्ण पक्षाच्या 12व्या दिवशी तो साजरा केला जातो. पारंपारिक हिंदू दिनदर्शिकेनुसार 'अश्विन' हा सण साजरा होतो. 

Vasu Baras 2023: काय आहे वसुबारसला गाईंना नैवेद्य दाखवण्याचं कारण... जाणून घ्या गवारीची-भाजी आणि भाकरी खाण्याचे महत्त्व

Vasu Baras 2023 : गोवत्स द्वादशी हा एक पवित्र हिंदू सण आहे. ज्यादिवशी आपण गायी आणि वासरांची पूजा करतो आणि त्यांच्या प्रति आपले आभार व्यक्त करतो. गोवत्स द्वादशी म्हणजे संस्कृतमध्ये बारा असे होते आणि कृष्ण पक्षाच्या 12व्या दिवशी तो साजरा केला जातो. पारंपारिक हिंदू दिनदर्शिकेनुसार 'अश्विन' हा सण साजरा होतो. 

 गायी आणि वासरांची पूजा : 

हा सण समृद्धीचे प्रतीक आहे. असे मानले जाते की जेव्हा भक्त गोवत्स द्वादशीच्या दिवशी 'सात्विक' कामं करतात किंवा उपवास करतात आणि या दिवशी ध्रुव नक्षत्राची प्रार्थना करतात तर त्यांच्या पापांपासून मुक्ती होते. या दिवशी गायीची पूजा करणाऱ्या भक्तांना शांती, आनंद आणि निरोगी आयुष्य लाभते. आपल्या ग्रंथांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे, विविध हिंदू देवता आणि देवी विविध प्राण्यांच्या रूपात अवतरले आहेत. म्हणूनच आपण सर्व प्राण्यांमध्ये गाईला सर्वात पवित्र मानतो. वसुबारसला कामधेनूला सर्वात जास्त महत्त्व आहे, कारण असे मानले जाते की कामधेनू सर्व इच्छा पूर्ण करते. या दिवशी गाईंचे पूजन केल्यानंतर गाईला नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. या नेवेद्यामागेही एक विशेष कारण आहे. 

 विशेष नैवेद्य : 

वसुबारस या दिवशी एक विशेष नैवेद्य बनवला जातो, जो तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. या नैवेद्यामध्ये गाईला भाजी-भाकरी आणि गोडाचा नैवेद्य दाखवतात आणि नंतर तो नैवेद्य प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करायचा असतो. या नैवेद्यामध्ये भाजी-भाकरी आणि गोडाचे पदार्थ असतात. यामध्ये गवारीची भाजी, भाकरी आणि गुळाचा समावेश असतो. या पदार्थांमागेही एक कारण आहे. 

दिवाळीच्या वेळी हिवाळ्याचा ऋतू असतो आणि या ऋतूमध्ये  आपल्या शरीरामध्ये नैसर्गिकरित्या उष्णता निर्माण व्हावी म्हणून आपण अनेक पदार्थांचे सेवन करायचे असते. 

गुळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त आहे. ते हिमोग्लोबिन पातळी चांगली ठेवण्यासाठी मद्दत करते आणि बाजरीची भाकरी देखील असंच काम करते. ही भाकरी शरीरात उष्णता रोखते. तर गवारीची भाजी खाण्यामागचे असे कारण आहे की त्यात प्रोटीन,फायबर, व्हिटामिन, फॉसफरस, कॅल्शिअम, आयर्न असे अनेक घटक असतात, यामुळेही भाजी हिवाळ्यात शरीरासाठी खूप आरोग्यदायी असते. आणि म्हणूनच आपणयाचे नैवेद्य दाखवून ते प्रसाद म्हणून खातो.

TAGS

diwali 2023 pujan vidhishubh muhurtdiwali kab haidussehra kab haibhai dooj kab haidhanteras kab haigovardhan puja 2023kab hai govardhan pujanarak chaturdashi 2023kab hai narak chaturdashi 2023narak chaudas 2023दिवाली 2023दशहरा 2023धनतेरस 2023भाई दूज 2023दिवाळीदसराधनत्रयोदशीभाऊबीजपाडवाVasu Baras 2023vasubaras 2023Vasubaras 2023 DateVasubaras ImportanceVasubaras Shubh MuhuratVasubaras Puja RitualsVasu Baras PoojaVasu Baras 2023 MessagesVasu Baras ImagesVasu Baras MessagesVasu Baras quotesVasu Baras SmsVasu Baras wishesगोवत्स द्वादशीगोवत्स द्वादशी 2023गोवत्स द्वादशी मराठी शुभेच्छागोवत्स द्वादशी मराठी संदेशगोवत्स द्वादशी शुभेच्छावसुबारसवसुबारस 2023वसुबारस SMSवसुबारस च्या शुभेच्छावसुबारस फोटोवसुबारस मराठी मेसेजवसुबारस मराठी संदेशवसुबारस मेसेजवसुबारस विचारवसुबारस शुभेच्छावसुबारस शुभेच्छा संदेशसण आणि उत्सवदिवाळी 2023दीपावलीवसुबारस तारीखवसुबारस पूजावसुबारस महत्त्वDeepavaliDeepavali 2023diwal
Read More