Marathi News> भविष्य
Advertisement

ही असली जत्रा तुम्ही कधी पाहिली नसेल! दिसेल त्याच्या गळ्यात साप; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

या जत्रेत मिथिला प्रदेशातील लोक हजेरी लावतात. ज्यामध्ये खगारिया, सहरसा, बेगुसराय आणि मुझफ्फरपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.  

ही असली जत्रा तुम्ही कधी पाहिली नसेल! दिसेल त्याच्या गळ्यात साप; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

बिहारच्या समस्तीपूर येथील सिंघिया घाटावर शेकडो भाविक नाग पंचमीनिमित्त आयोजित जत्रेत सहभागी होण्यासाठी दाखल झाले होते. नागपंचमी हा एक पारंपारिक कार्यक्रम आहे, जिथे लोक धार्मिक विधींचा भाग म्हणून साप वाहून नेतात. सर्व भाविक गळ्यात साप घेऊन जात असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  व्हिडीओत प्रत्येकाच्या गळ्यात साप दिसत आहे. 

वार्षिक जत्रेची सुरुवात सिंघिया बाजारातील माँ भगवती मंदिरात प्रार्थनेने झाली. त्यानंतर भाविक बुधी गंडक नदीच्या काठावर गेले. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत, जवळजवळ प्रत्येकजण साप घेऊन जात होता. सर्वांनी आपल्या गळ्यात साप गुंडाळला होता. काहींनी त्यांच्या डोक्यावर साप ठेवले होते. 

व्हिडीओंमध्ये सविस्तरपणे हे दृश्य दिसत आहे. व्हिडीओत कुटुंबं गर्दीतून सापांना त्यांच्या शरीराभोवती सहजपणे लटकवून फिरताना दिसत आहेत. काही व्हिडीओंमध्ये लोक सापांनी वेढलेल्या लाकडी काठ्या घेऊन जाताना दिसत आहेत. येछे सरपटणाऱ्या प्राण्यांना धोकादायक प्राण्यांपेक्षा पवित्र मानलं जातं.

परंपरेचा भाग म्हणून, भाविकांनी स्थानिक सर्पदेवता माता विशरीच्या नावाचा उच्चार करत प्रार्थना केली. काही भाविकांनी तर तोंडात साप पकडण्यासारखे पराक्रमही केले. पूजा केल्यानंतर सापांना जवळच्या जंगली भागात सोडण्यात आले.

या जत्रेत मिथिला प्रदेशातील लोक हजेरी लावतात. ज्यामध्ये खगारिया, सहरसा, बेगुसराय आणि मुझफ्फरपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. सार्वजनिक मिरवणुकीव्यतिरिक्त, महिला गहवरांमध्ये (पवित्र वृक्ष किंवा कुंपण) विशेष पूजा करतात. पूजा करताना प्रजनन क्षमता, कौटुंबिक आरोग्य आणि संरक्षणासाठी नाग देवतेला प्रार्थना केली जाते. इच्छा पूर्ण झाल्यानंतर, त्या नागपंचमीला कृतज्ञता म्हणून झाप (अर्पण) आणि प्रसाद अर्पण करण्यासाठी परततात.

स्थानिक रिपोर्टनुसार, अद्यापपर्यंत या जत्रेत सर्पदंश आणि जखमी झाल्याच्या कोणत्याही घटनांची नोंद झालेली नाही. 

Read More