Marathi News> भविष्य
Advertisement

Vivah Muhurt March 2024 : मार्च महिन्यात लग्नासाठी 'हे' 10 दिवस शुभ, जाणून घ्या तारीख आणि विवाह मुहूर्त

Vivah Muhurt March 2024 : सध्या सगळीकडे लगीनसराई सुरु आहे. असं असताना मार्च महिन्यात लग्नाचे 10 मुहूर्त आहे. ज्या दिवशी करु शकता लग्न. 

Vivah Muhurt March 2024 : मार्च महिन्यात लग्नासाठी 'हे' 10 दिवस शुभ, जाणून घ्या तारीख आणि विवाह मुहूर्त

हिंदू धर्मात लग्न हे एक पवित्र बंधन आहे. जेथे वधु-वर सात फेरे घेऊन लग्नबंधनात अडकतात. एकमेकांना सात जन्मासाठी साथ देण्याच्या आणाभाका घेतात. या कारणामुळेच लग्नाकरिता शुभ मुहूर्त पाहिला जातो. ज्यामध्ये मुला-मुलींची जन्मपत्रिका पाहिली जाते. ग्रह-नक्षत्रांचा विचार करुन लग्न तारीख ठरवली जाते. 2024 मधील मार्च महिन्यात शुभ मुहूर्त कधी आहेत, ते जाणून घ्या.

मार्च महिन्यातील लग्नांचे शुभ मुहूर्त 

तारीख शुभ मुहूर्त तिथी 
1 मार्च 2024  सकाळी 6.46 ते दुपारी 12.48 षष्ठी
2 मार्च 2024 रात्री 8.24 ते 3 मार्च सकाळ 6.44 षष्ठी 
3 मार्च 2024  सकाळी 6.44 ते दुपार 3.55 सप्तमी
4 मार्च 2024 रात्री 11.16 ते 5 मार्ट सकाळी 6.42 अष्टमी 
5 मार्च 2024 सकाळी 6.42 ते दुपारी 2.09 नवमी 
6 मार्च 2024  दुपारी 2.52 7 मार्च रात्री 10.05 एकादशी 
7 मार्च 2024  सकाळी 6.40 ते सकाळी 8.24  द्वादशी 
10 मार्च 2024  सकाळी 1.55 ते 11 मार्च 6.35 अमावस्या
11 मार्च 2024 सकाळी 6.35 ते 12 मार्च सकाळी 6.34 प्रतिपदा 
12 मार्च 2024 सकाळी 6.34 ते दुपारी 3.08 द्वितीया 

लग्नासाठी शुभ नक्षत्र कोणते 

लग्नाच्या मुहूर्तांमध्ये ज्योतिष शास्त्राला देखील तितकेच महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्रानुसार पूर्वा फाल्गुनी, श्रावण, हस्त, अश्विनी, स्वाती, रोहिणी, उत्तरा फाल्गुनी, मघा, अनुराधा, मूल, धनिष्ठा, रेवती, मृगाशिरा आणि चित्रा ही नक्षत्रे विवाहासाठी चांगली मानली जातात. पुष्य नक्षत्रात लग्न करू नये, त्यामुळे वैवाहिक जीवनात सुख-शांती येत नाही.

लग्नाच्या शुभ आणि अशुभ तिथी

शुभ तिथी - द्वितीया तिथी, तृतीया तिथी, पंचमी तिथी, सप्तमी तिथी, एकादशी तिथी आणि त्रयोदशी तिथी

प्रतिकूल तिथी- चतुर्थी तिथी, नवमी तिथी आणि चतुर्दशी तिथी

लग्नासाठी शुभ दिवस

आठवड्यातील सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे लग्नासाठी शुभ दिवस मानले जातात. मंगळवारी लग्न करणे टाळावे.

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Read More