Washing Clothes Astrology Tips : ज्योतिषशास्त्रानुसार वास्तूशास्त्र आहे, ज्यात तुमच्या घराचे आणि रोजच्या दैनदिन कार्यातील गोष्टींबद्दल सांगण्यात येतं. वास्तू म्हणजे घर, ऑफिस, कामाचं ठिकाण...यातील रचना तिथल्या वस्तू दिशा याबद्दल वास्तूशास्त्रानुसार नियम सांगण्यात आले आहेत. असं एक नियम वास्तूशास्त्रात घरात कपडे कधी धुवायचे याबद्दलही सांगण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रात प्रत्येक दिवसाचे विशेष महत्त्व आहे. काही दिवस असे असतात जे फक्त पूजा किंवा विश्रांतीसाठी मानले गेले आहेत. या खास दिवशी कपडे धुतले तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि पैशाचे नुकसान होतं अस शास्त्रात मानलं गेलं आहे.
गुरुवार आणि शनिवारी कपडे धुणे अशुभ मानले गेले आहे. गुरुवार हा भगवान विष्णूचा दिवस आहे आणि शनिवार हा शनिदेवाचा दिवस आहे. या दिवसांत घरातील कामांमध्ये जास्त व्यस्त राहिल्याने या देवतांचे आशीर्वाद थांबतो, असं वास्तूशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
गुरुवारी कपडे धुणे, केस कापणे किंवा दाढी करणे निषिद्ध मानले गेले आहे. हा दिवस ज्ञान, समृद्धी आणि गुरुपूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो. गुरुवारी कपडे धुण्याने देवी लक्ष्मी कोपते आणि घराच्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होतो असा एक समज आहे. आजही, अनेक कुटुंबांमध्ये, गुरुवारी कपडे धुणे, घर झाडू लावणे किंवा पुसणे पूर्णपणे टाळले जाते. असे करणे हा शुभता राखण्याचा एक मार्ग मानला जातो.
शनिवारी शनिदेवाची पूजा केली जाते. हा दिवस कर्म, न्याय आणि कडकपणाचे प्रतीक मानला जातो. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी लोक या दिवशी उपवास करतात आणि दान करतात. पण जर या दिवशी कपडे धुण्यासारखे काम केले तर ते अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्र म्हणते की यामुळे जीवनात अडथळे येऊ शकतात, पैसे अडकू शकतात आणि कोर्ट केसेस होऊ शकतात. विशेषतः जर घरात आधीच आर्थिक समस्या असतील तर शनिवारी कपडे धुण्याने परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.
आजच्या काळात बरेच लोक या गोष्टींना अंधश्रद्धा मानतात, पण आजही अनेक घरांमध्ये या परंपरा पूर्ण भक्तीने पाळल्या जातात. अनेक वास्तु तज्ञांचा असा विश्वास आहे की हे नियम केवळ धार्मिक कारणांसाठीच नाही तर मानसिक शांती आणि दैनंदिन दिनचर्या राखण्यासाठी देखील बनवले गेले आहेत. जर आपण थोडे जागरूक राहिलो आणि या परंपरा समजून घेतल्या तर जीवनात संतुलन राखणे सोपे होते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)