Weekly Tarot Horoscope Prediction 21 to 27 July 2025 in Marathi : जुलैच्या या आठवड्यात अनेक शुभ संयोग जुळून आला आहे. या आठवड्याची सुरुवात कामिनी एकादशीने होत आहे. तर गुरुवारी 24 जुलैला आषाढी किंवा दीप अमावस्या असणार आहे. त्यासोबत या आठवड्यात सूर्य आणि बुध कर्क राशीत भ्रमण करत असल्याने अतिशय शुभ असा बुधादित्य राजयोग जुळून आला आहे. बुधादित्य राजयोगाच्या प्रभावाने व्यक्तीला करिअर, व्यवसाय, कुटुंब आणि आर्थिक बाबींमध्ये फायदा होतो. अशा परिस्थितीत, टॅरो कार्ड्सची गणनानुसार मिथुन, कर्क, सिंह, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप अद्भुत ठरणार आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या बुद्धिमत्तेने नवीन संधी मिळणार आहे. असा हा आठवडा मेष ते मीन पर्यंत सर्व राशींसाठी कसा असेल पाहा.
टॅरो कार्ड्सच्या गणनेवरून या लोकांसाठी हा आठवडा कामात पूर्णपणे व्यस्त राहणार आहे. तुम्ही तुमच्या मेहनतीने आणि बुद्धिमत्तेने समाजात आणि कामाच्या ठिकाणी चांगले नाव कमवणार आहात. या आठवड्यात तुम्ही कोणतेही निर्णय घ्याल, त्यात व्यावहारिकता आणि बुद्धिमत्ता दाखवणे गरजेचे असणार आहे. भावनांमध्ये वाहून जाऊन कोणतेही मोठे पाऊल उचलू नका अन्यथा तुमचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. आठवड्याचा मधला भाग प्रेम जीवनासाठी चांगला राहणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत काही चांगले क्षण घालवण्याची संधी मिळणार आहे. ज्यामुळे नातेसंबंध मजबूत होणार आहे. घरात छोटी कामे देखील पूर्ण होणार आहेत. या आठवड्यात जुनी अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होणार आहे.
या राशीच्या लोकांना संयम आणि सावधगिरीने पुढे जावं लागणार आहे. या आठवड्यात तुम्हाला नको असलेल्या सहलीला जावे लागण्याची शक्यता आहे. म्हणून आधीच तयारीत रहा. या आठवड्यात सल्ल्याशिवाय कोणताही मोठा निर्णय तुमच्यासाठी कठीण राहणार आहे. कामाच्या ठिकाणी अडथळे कमी होणार असून कामाला गती मिळणार आहे. तुमच्या कष्टाचे फळ या आठवड्यात मिळणार आहे. पण या आठवड्यात पैसा खर्च होणार आहे. कुटुंबासोबत वेळ घालवा आणि जुन्या बाबी सोडवावा लागणार आहे. आठवड्याच्या अखेरीस कामात प्रगती प्राप्त होणार आहे. पैशांची हुशारीने गुंतवणूक करा जेणेकरून तुम्हाला निश्चितच फायदा होणार आहे.
या राशीचे लोक या आठवड्यात शांततेने आणि संयमाने काम करणार आहेत. तुमचे बोलणे आणि बुद्धिमत्ता ऑफिसमध्ये नवीन संधी आणणार आहे. नवीन काम सुरू होणार आहे. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होणार आहे. यावेळी तुमच्या सवयी बदला आणि सकारात्मक विचार करणार आहात. वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर लक्ष ठेवून असणार आहे. म्हणून अजिबात निष्काळजी राहू नका. तुमचे काम पूर्ण जबाबदारीने करा. कुटुंबातही तुमच्या सल्ल्याची आवश्यकता असणार आहे. या आठवड्यात तुमचा तुमच्या जोडीदाराशी चांगला समन्वय राहणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रित ठरणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार आहे. पण काही आव्हाने देखील येणार आहेत. जर या राशीचे लोक स्पर्धा किंवा मुलाखतीची तयारी करणार आहेत. तर त्यांना नक्कीच यश मिळणार आहे. कला, लेखन किंवा संगीताशी संबंधित लोक त्यांच्या प्रतिभेने लोकांना प्रभावित करणार आहेत. कुटुंबात नवीन काम सुरू होणार आहे. तसंच, या आठवड्यात तुम्हाला धार्मिक कार्यात रस असणार आहे. या आठवड्यात विरोधकांपासून सावध राहा. नातेसंबंधांमध्येही संवाद ठेवा, यामुळे परस्पर समज मजबूत होणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी काहीतरी नवीन करण्याचा हा आठवडा असणार आहे. याचा अर्थ असा की हा आठवडा तुमची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ असणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्ही जुन्या मित्रांना किंवा नातेवाईकांना भेटणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहणार आहे. कोणतीही नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कामात नवीन तंत्रज्ञान किंवा नवीन पद्धत स्वीकारणे फायदेशीर ठरणार आहे. सामाजिक पातळीवर नवीन लोक सामील होतील जे भविष्यात मदतगार ठरणार आहे. कुटुंबातही आनंदी वातावरण राहणार आहे. लक्षात ठेवा की या आठवड्यात तुम्ही जे काही काम कराल ते आत्मविश्वासाने करा, तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे.
हा आठवड्याची सुरुवात कन्या राशीच्या लोकांसाठी थोडी गोंधळात टाकणारी राहणार आहे. एखाद्याच्या बोलण्याने तुम्हाला त्रास होणार आहे. ज्यामुळे मानसिक ताण येणार आहे. जोडीदाराशी किंवा कुटुंबातील सदस्याशी मतभेद होणार आहे. म्हणून संभाषणात सौम्यता बाळगावा लागणार आहे. तुमच्या आरोग्याची काळजी आणि तुमच्या आहाराकडे लक्ष द्या. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला एक नवीन संधी मिळणार आहे. जी भविष्यात तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. प्रेमसंबंधांमधील मतभेद दूर होणार आहे. तुम्हाला कामावर एक नवीन जबाबदारी देखील मिळणार आहे, जी तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडणार आहात.
या आठवड्यात तूळ राशीच्या लोकांसाठी काही मानसिक तणाव जाणवणार आहे. घरात किंवा कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. प्रकरण वाढवण्याऐवजी ते शांततेने सोडवणे तुमच्या हिताचे ठरेल. धीर धरा आणि कोणत्याही गोष्टीवर रागावू नका. विद्यार्थी कठोर परिश्रम करूनच यश मिळणार आहे. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला एक नवीन संधी मिळणार आहे. विशेषतः गुरुवारी तुम्हाला काही चांगली बातमी मिळणार आहे. तुमचे विरोधक कितीही प्रयत्न केले तरी ते तुमचे नुकसान होणार नाही. तुम्हाला एखादा छंद पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहणार आहे. कठोर परिश्रम आणि समर्पण कामात यश मिळवून देणारा असणार आहे. ऑफिसमध्ये तुम्हाला सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळणार आहे. जुनी इच्छा पूर्ण होणारा हा आठवडा असणार आहे. भावनिक बाबींमध्ये थोडी संवेदनशीलता राहणार आहे. पण तुम्हाला कुटुंब आणि मित्रांचा पाठिंबा मिळणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला कामासाठी प्रवास करावा लागणार आहे. तुम्ही नातेवाईकांना भेटाल. आर्थिक लाभ होण्याचीही चांगली संधी मिळणार आहे.
या राशीच्या लोकांना त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. जुना आजार तुम्हाला त्रास देणार आहे. कामासाठी नवीन योजना बनवाव्या लागतील. इतरांचे ऐकून कोणताही निर्णय घेऊ नका. पैशांची काळजी घ्या कारण तुमचे खर्च होणार आहे. पण आधी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा मिळणार आहे. प्रेम जीवनात परस्पर समजूतदारपणा सुधारणार आहे. कुटुंबासोबत छोटीशी सहल घडणार आहे. आठवड्याचा शेवट कुटुंबासोबत आनंदाने जाणार आहे.
या लोकांसाठी ऊर्जा आणि सर्जनशीलतेने भरला हा आठवडा असणार आहे. आत्मविश्वास वाढणार असून लोकांना तुमचे नेतृत्व आवणार आहे. अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी हा काळ चांगला राहणार आहे. त्यांना यश मिळणार आहे. तुमच्या प्रेम जीवनाबद्दल बोलायचं झालं तर, तुमचे नातं मजबूत होणार आहे. व्यवसायात नवीन करार किंवा प्रकल्पातून तुम्हाला फायदा होणार आहे. मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे. एकंदरीत, हा आठवडा तुमच्या मेहनतीची ओळख पटवेल आणि तुम्ही नवीन संधींकडे वाटचाल करणार आहात.
या लोकांना नोकरी आणि व्यवसायात चांगले परिणाम प्राप्त होणार आहे. नवीन नोकरी किंवा मोठा प्रकल्प मिळणार आहे. जुने संपर्क उपयुक्त ठरणार आहे. पण या काळात केलेला कोणताही नवीन करार फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या जोडीदाराची काळजी घ्या कारण त्याच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात प्रेम राहणार आहे. पैशांशी संबंधित बाबींमध्ये थोडे सावधगिरी बाळगा. नवीन संधी ओळखून पुढे जाण्याची ही वेळ असणार आहे.
या आठवड्यात मीन राशीच्या लोकांसाठी सर्जनशील कामांमध्ये व्यस्तता येणार आहे. तुमच्या कला आणि प्रतिभेचे कौतुक होणार आहे. कामाचा ताण वाढणार आहे, ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवणार आहे. पण तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. तुमची जुनी मैत्रीण भेटणार आहे. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होणार आहात. वैवाहिक जीवनात शांती राहणार आहे. तुमच्या जोडीदाराशी छोटासा वाद होईल पण, म्हणून धीर सोडू नका. एकूणच, हा आठवडा मिश्रित पण सकारात्मक राहणिार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती टॅरो कार्डवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)