Weekly Tarot Horoscope Prediction 23 to 29 June 2025 in Marathi : जूनच्या शेवटच्या आठवड्यात चंद्र आणि गुरु एकमेकांपासून मध्यस्थानी असल्याने गजकेसरी राजयोगाची संयोग जुळून आला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, गजकेसरी राजयोग व्यक्तीला धन, आनंद आणि आदर प्राप्त होतो. यासोबतच या राशीच्या लोकांना नफ्याच्या चांगल्या संधीही त्यांच्या आयुष्यात चालून येतात. अशा परिस्थितीत, टॅरो कार्ड्सची गणना सांगते की जूनचा शेवटचा आठवडा मेष ते मीन राशीसाठी कसा असणार आहे, जाणून टॅरो कार्ड रिडर कविता यांच्याकडून
या राशीच्या लोकांसाठी जूनचा शेवटचा आठवडा यशाचा आणि सामाजिक प्रतिष्ठेचा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कार्यक्षमता आणि नेतृत्व कौशल्याचे कौतुक होणार आहे. ज्यामुळे तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विशेष सहकार्य प्राप्त होणार आहे. पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी तुम्हाला मिळणार आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासामुळे तुमच्या कारकिर्दीला नवीन दिशा प्राप्त होणार आहे. जरी काही जवळचे लोक मत्सरामुळे नकारात्मक वागू शकतात, तरीही तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणार आहात.
या आठवड्यात तुम्हाला व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागणार आहे. हुशारीने गुंतवणूक करा, अन्यथा तुमचे नुकसान होण्याची शक्यता असते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ असणार आहे. प्रलंबित शैक्षणिक कामात प्रगती पाहिला मिळणार आहे. उत्पन्न स्थिर राहणार आहे. आर्थिक बचतही हळूहळू वाढणार आहे. वैवाहिक जीवनात काही मुद्द्यांवर मतभेद होणार आहे. म्हणून संयम आणि शहाणपणाने वागणे हिताचे ठरेल.
या राशीच्या लोकांना जास्त जास्त सावधगिरी बाळगावी लागणार आहे. नफ्यात घट झाल्यामुळे तुम्हाला तणाव जाणवणार आहे. कामाच्या ठिकाणी विरोधक सक्रिय राहणार आहे. तुमच्याविरुद्ध कट रचला जाणार आहे. वैवाहिक जीवनात गैरसमज निर्माण होतील. म्हणून बोलताना पारदर्शकता ठेवणे हिताचे ठरणार आहे. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका आणि कठोर परिश्रमावर विश्वास ठेवा.
या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी आर्थिक आव्हानांनी भरलेला असणार आहे. व्यवसायात नफा मिळविण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागणार आहे. वारंवार येणारे अडथळे मनाला त्रासदायक ठरणार आहे. तुम्हाला मानसिक गोंधळ आणि दुविधा जाणवणार आहे. पण आठवड्याच्या अखेरीस परिस्थिती हळूहळू सुधारणार आहे. संयम आणि कठोर परिश्रम तुमच्यासाठी यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे.
या आठवड्यात तुम्हाला व्यवसायातील निर्णय काळजीपूर्वक घ्या. कारण तुमचे व्यवहार अपेक्षेप्रमाणे यशस्वी होताना दिसणार नाही. कुटुंबाच्या पाठिंब्याचा अभाव तुमचे मन अस्वस्थ राहणार आहे. अनावश्यक चिंता आणि राग वाढणार आहे. घरातील वडीलधाऱ्यांशी किंवा तुमच्या जोडीदाराशी मतभेद होतील. म्हणून बोलण्यात गोडवा ठेवणे हिताचे ठरणार आहे.
राजकारण, प्रशासन किंवा सामाजिक कार्यात सहभागी असलेल्या लोकांना हा आठवडा अनुकूल असणार आहे. या आठवड्यात तुमचे विरोधक शांत असणार आहे. तुमचा प्रभाव क्षेत्र वाढणार आहे. जुन्या आजारांपासून मुक्तता मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे चांगले फळ प्राप्त होणार आहे. नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास यश तुमच्यासोबत असणार आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडणार आहे. ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहेत. तर, मुले आणि शिक्षणाशी संबंधित काही बाबींमध्ये काही अडथळे येऊ शकतात. आरोग्याबाबत सावधगिरी बाळगा. विशेषतः अन्नाबाबत निष्काळजीपणा करु नका. काही कायदेशीर किंवा सरकारी प्रक्रियेत अडकू शकतात. म्हणून कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा आणि हुशारीने निर्णय घ्या नाहीतर महागात पडेल.
या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही अस्थिरता येण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीनुसार निकाल न मिळाल्याने तुम्ही निराश वाटेल. तरीही, तुम्ही आतापर्यंत ज्या योजना पुढे ढकलत होता त्या सुरू करण्याची ही योग्य वेळ आहे. कौटुंबिक जीवनात शांती असणार आहे. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भेट तुमच्या करिअरला नवीन दिशा मिळणार आहे. तुम्हाला मित्रांकडून पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास द्विगुणीत होणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी चांगले नियोजन करणे महत्वाचे आहे. तुमच्या आहाराची आणि आरोग्याची विशेष काळजी या आठवड्यात घ्या. मित्रांकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. राहू-केतूचे संक्रमण मानसिक असंतुलन निर्माण करणारे असणार आहे. म्हणून सकारात्मक विचारसरणी ठेवा. प्राणी आणि पक्ष्यांची सेवा केल्याने तुम्हाला आंतरिक शांती प्राप्त होणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी, तुम्ही अलीकडेच सुरू केलेल्या कामाचे या आठवड्यात सकारात्मक परिणाम पाहिला मिळणार आहे. घराच्या दुरुस्ती किंवा मालमत्तेशी संबंधित कामावर खर्च होणार आहे. आरोग्याबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक असणार आहे. विशेषतः जर तुम्हाला कोणताही जुनाट आजार असेल तर, निष्काळजी राहू नका. राग आणि अधीरता टाळा, यामुळे तुमचे नाते बिघडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी शिस्त आणि कठोर परिश्रम यश प्राप्त करणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी जूनचा आठवडा सरकारी योजना किंवा उच्च अधिकाऱ्यांशी संबंधित कोणत्याही प्रकल्पातून लाभ मिळणार आहे. सेवेच्या भावनेने केलेले कोणतेही काम तुम्हाला समाजात प्रतिष्ठा देणारे ठरणार आहे. सर्जनशील कामात रस वाढणार आहे. तुमच्या प्रतिभेला मान्यता प्राप्त होणार आहे. व्यावसायिकांसाठी, विशेषतः जर तुम्हाला नवीन काम सुरू करायचे असेल तर वेळ फायदेशीर ठरणार आहे.
या आठवड्यात तुम्हाला आर्थिक लाभाची संधी प्राप्त होणार आहे. अनावश्यक चिंता आणि गोंधळापासून दूर राहा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या. तुमची नेतृत्व क्षमता समोर येणार आहे. काही मोठे यश किंवा चांगली बातमी कानावर पडणार आहे. इतरांवर शंका घेऊ नका आणि स्वतःचे निर्णय घ्या. आव्हाने असूनही, नफा वाढेल आणि तुम्हाला आदर मिळेल.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती टॅरो कार्डवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)