Marathi News> भविष्य
Advertisement

Ganesh Chaturthi 2025 : 26 की 27 ऑगस्ट कधी आहे गणेश चतुर्थी? यंदा बाप्पा 10 की 11 किती दिवस असणार विराजमान?

Ganesh Chaturthi 2025 : श्रावण महिना लागला की वेध लागतात ते गणेशोत्सवाचे...यंदा बाप्पाचं आगमन कधी असणार आहे आणि किती दिवस असणार आहे, जाणून घ्या. 

Ganesh Chaturthi 2025 : 26 की 27 ऑगस्ट कधी आहे गणेश चतुर्थी? यंदा बाप्पा 10 की 11 किती दिवस असणार विराजमान?

Ganesh Chaturthi 2025 Date Time : श्रावणाची चाहुल लागली असून यासोबत सण उत्सावाला सुरुवात होते.  मराठी पंचांगानुसार श्रावणानंतर येतो तो भाद्रपद महिना. या महिन्यात महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धूम असते. या गणेशोत्सावाची लगबग श्रावणापूर्वीपासूनच सुरु होते. कारखान्यात गणेशाची मूर्ती घडविण्यात येत आहेत. आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठीही गणेशभक्त या मूर्तीकारांकडे जाणून आपल्या आवडीची मूर्ती पसंत करताना दिसून येत आहे. यंदा बाप्पा 26 की 27 ऑगस्ट नेमक्या कोणत्या तिथीला येत आहे, किती दिवस विराजमान असणार आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती. 

2025 मध्ये किती दिवस गणेश चतुर्थी?

पंचांगानुसार, यावर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 26 ऑगस्ट दुपारी 01:54 वाजेपासून दुसऱ्या दिवशी 27 ऑगस्टला दुपारी 03:44 वाजेपर्यंत असणार आहे. हिंदू धर्मात उदय तिथीनुसार गणेश चतुर्थी 27 ऑगस्ट 2025 रोजी साजरी करण्यात येणार आहे. 

गणेश चतुर्थी पूजा शुभ मुहूर्त 2025 पाहा

मराठी पंचांगानुसार 27 ऑगस्ट 2025 ला गणेश पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 11.05 ते दुपारी 01.40 पर्यंत असणार आहे. 

गणेश चतुर्थी पंचांग 2025

सूर्योदय पहाटे 05:57 वा.
सूर्यास्त संध्याकाळी 06:48 वा.
चंद्रोदय सकाळी 09:28 वा.
चंद मावळतो रात्री 08:56 वा.
ब्रह्म मुहूर्त पहाटे 04:28 ते 05:12 वाजेपर्यंत
विजय मुहूर्त दुपारी 02:31 ते 03:22 वाजेपर्यंत
संधिप्रकाशाची वेळ संध्याकाळी 06:48 ते 07:10 वाजेपर्यंत
निशिता मुहूर्त दुपारी 12 ते 12:45 वाजेपर्यंत

 

हेसुद्धा वाचा - Shravan 2025 : उत्तर भारतीयांचा श्रावण महिना सुरु झाला, महाराष्ट्रात कधी? यंदा किती श्रावणी सोमवार?

 

बाप्पा 10 की 11 किती दिवस असणार विराजमान?

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषासोबत आपण बाप्पाला निरोप देतो. यंदा बाप्पाने तुमच्या जयघोषाला साद देत तो 11 दिवस लवकर येणार आहे. 27 ऑगस्ट 2025 ला बाप्पा येणार असून 6 सप्टेंबर 2025 ला अनंत चतुर्दशीला आपण त्याला निरोप देणार आहोत. तर 31 ऑगस्ट 2025 ला गौरीचं आगमन होणार असून 2 सप्टेंबर 2025 ला गौरी - गणपतीचं विसर्जन करण्यात येणार आहे. 

(Disclaimer: या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read More