Ramayan Katha : रामायण हे श्रीराम आणि रावण यांच्या युद्धाबद्दल सांगितलंय. माता सीतेचे अपहरण केल्यानंतर श्रीराम यांनी रावणाशी युद्ध केलं. श्रीरामा आणि लक्ष्मणला रावणाचा पराभव करण्यासाठी हनुमान आणि वानर सेनेने मदत केली होती. तर रावणाकडे राक्षस सेना होती. वानर सैन्य यांनी कधीही कोणतंही युद्ध केलं होतं. म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षणही नव्हतं. वैशिष्ट म्हणजे असं असतानाही राम आणि त्यांच्या वानर सेनेने रावणाच्या सैन्याचा पराभव केला. रावणाचा पराभव करुन श्रीराम अयोध्येत परतले. सर्वत्र आनंदाचे वातावरण होतं. पण तुम्ही कधी विचार केलाय का की श्रीरामाला मदत करणारी वानर सेना नंतर कुठे गेली ते.
रामायणात, श्रीरामांना रावणाचा पराभव करण्यास मदत करण्यात वानर सैन्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. रावणाचा पराभव करून श्रीराम अयोध्येला परततात. पण त्या वानर सैन्याचे काय झाले किंवा वानर सैन्याचे नेतृत्व करणारे सुग्रीव, अंगद किंवा नील कुठे गेले हे कोणालाही माहिती नाही.
रामायणातील उत्तरकांडात, जेव्हा सुग्रीव लंकेहून परतला तेव्हा श्री रामांनी त्याला किष्किंधा नगरीचा राजा बनवलं. बालीचा मुलगा अंगद याला युवराज बनवलं. नंतर दोघांनीही अनेक वर्षे एकत्र राज्य केले. ती वानरसेना अनेक वर्षे सुग्रीवाकडे राहिली; पण त्यानंतर त्याने कोणतेही मोठे युद्ध लढले की नाही, याबद्दल काही माहिती नाही.
वानर सैन्यातील सदस्य नल आणि नीला हे सुग्रीवाच्या राज्यात मंत्री म्हणून काम करत होते. सुग्रीव आणि अंगद यांनी किष्किंधाचे राज्य वाढवले. हे शहर आजही अस्तित्वात आहे. किष्किंदा कर्नाटकातील तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले आहे. हे जगप्रसिद्ध हंपीजवळ बेल्लारी जिल्ह्यात आहे. राम आणि लक्ष्मण ज्या गुहांमध्ये राहिले होते त्या किष्किंधा येथेही आहेत. त्या गुहांमध्ये खूप जागा आहे.
किष्किंधाभोवती खूप दाट जंगल असून त्याला दंडकारण्य म्हणतात. तिथे राहणाऱ्या आदिवासींना बंदर म्हटलं जात असं. रामायणात वर्णन केलेला किष्किंधाजवळील ऋष्यमूक पर्वत आजही अस्तित्वात आहे. तिथे हनुमानाचे गुरु मातंग ऋषी यांचा आश्रम होता.
रावणाने सीतेला कैद केल्यानंतर, श्री रामांनी हनुमान आणि सुग्रीवाच्या मदतीने वानर सैन्य गोळा केले आणि लंकेला निघाले. तामिळनाडूचा हा किनारा एक हजार किलोमीटर लांब आहे. कोडिकराई बीच वेलंकन्नीच्या दक्षिणेस आहे. पूर्वेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला पाल्क सामुद्रधुनीने वेढलेले आहे. राम तिथेच थांबला, सल्लामसलत केली आणि मग रामेश्वरकडे निघाला.
वानर सैन्यात वानरांचे अनेक गट होते. त्यात सुमारे एक लाख माकडे होती. ती माकडे लहान राज्यांची छोटी सैन्ये होती. ते किष्किंदा, कोल, भिल्ल, अस्वल आणि वनवासी होते. श्री रामांनी कुशलतेने त्यांना एकत्र आणले. लंका जिंकल्यानंतर, वानरांची ती प्रचंड सेना आपापल्या राज्यात परतली. रामाने लंका आणि किष्किंधा शहर अयोध्या राज्यात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव नाकारला. म्हणून ती वानर सेना श्री रामाच्या राज्याभिषेकासाठी अयोध्येला गेली; पण ते आपापल्या शहरात परतले.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)