Marathi News> भविष्य
Advertisement

लोक रात्रीच्या वेळी स्मशानातून जाणे टाळतात कारण....

बहुतांश समज-गैरसमज हे मानसिक कारणातून येतात. असे असले तरीही काही लोक दोन गोष्टी प्रामुख्याने सांगतात. ज्याद्वारे ते स्मशानातून जाणे टाळण्याचे समर्थन करतात.

लोक रात्रीच्या वेळी स्मशानातून जाणे टाळतात कारण....

मुंबई : रात्रीच्या वेळी समशानातून किंवा स्माशानातील रस्त्यावरून जाणे लोक टाळतात. खरेतर घरातील ज्येष्ठ मंडळीच या गोष्टीला मनाई करतात आणि स्वत:ही ही गोष्ट कटाक्षाने पाळतात. खरेतर, स्माशानातून रात्रीच्या वेळी जाण्यामुळे फार काही विशेष घडते असे मुळीच नाही. खरेतर वास्तवापेक्षा स्मशानातील गोष्टींबाबत गैरसमजच अधिक असतात. यातील बहुतांश समज-गैरसमज हे मानसिक कारणातून येतात. असे असले तरीही काही लोक दोन गोष्टी प्रामुख्याने सांगतात. ज्याद्वारे ते स्मशानातून जाणे टाळण्याचे समर्थन करतात.

नकारात्मक शक्ती होतात क्रियाशील

- रात्रीच्या वेळी नकारात्मक शक्ती जास्त क्रियाशील होतात. मानसिक दृष्ट्या कमजोर असणाऱ्या व्यक्तिंवर अशा शक्ती तत्काळ प्रभुत्व मिळवतात. या शक्तिंनी मानसिकदृष्ट्या कमजोर लोकांच्या मनाचा ताबा घेतला की, तो व्यक्ती आपले संतुलन हरवून बसतो. तो अशा प्रकारचे वर्तन करतो की, पाहणाऱ्याला वाटते त्याच्याकडून कोणीतरी या गोष्टी करवून घेतो आहे.

भीतीतून निर्माण होतात गैरसमज

- पुराण ग्रंथ आणि परंपरेने चालत आलेल्या दंतकथांचाही लोकांच्या मनावर प्रचंड परिणाम असतो. त्यामुळे लोकांच्या मनात नको त्या गोष्टींबाबत अनेक गैरसमज निर्माण होतात. या गैरसमजातूनच भीती निर्माण होते आणि लोक स्मशानातून जाणे टाळतात.

Read More