Marathi News> भविष्य
Advertisement

...म्हणून PM मोदी 5 फेब्रुवारीलाच महाकुंभमध्ये करणार शाहीस्नान; तारीख निवडण्यामागे विशेष कारण

Why PM Modi Chose February 5 For Shahi Snan At Maha Kumbh: पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 फेब्रुवारीला महाकुंभमध्ये हजेरी लावणार असून शाहीस्नान करणार आहेत. मात्र त्यांनी ही तारीख निवडण्यामागे काही खास कारणं आहेत.

...म्हणून PM मोदी 5 फेब्रुवारीलाच महाकुंभमध्ये करणार शाहीस्नान; तारीख निवडण्यामागे विशेष कारण

Why PM Modi Chose February 5 For Shahi Snan At Maha Kumbh: महाकुंभला 13 जानेवारी 2025 पासून सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे गंगा, जमुना आणि सरस्वती नदीच्या संगमावर साधू, संत आणि भक्तांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. प्रयागराजमध्ये 144 वर्षांनी महाकुंभचा योग जुळून आल्याने या पवित्र संगमावर शाहीस्नान करण्यासाठी कोट्यवधी लोकांनी पहिल्या दोन आठवड्यांमध्ये हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. 

मोदी कधी लावणार हजेरी?

पंतप्रधान नरेंद्र मोदीही हिंदू धर्मियांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी या ठिकाणी भेट देणार असल्याने जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी 5 फेब्रुवारी रोजी महाकुंभला हजेरी लावणार आहेत. मोदी या संगमावर शाहीस्नान करणार आहेत. मात्र पंतप्रधान मोदींनी महाकुंभमध्ये सहभागी होण्यासाठी 5 फेब्रुवारीचीच तारीख निवडण्यामागेही एक खास कारण आहे. हे कारण काय आहे ते पाहूयात...

...म्हणून मोदी 5 तारखेलाच करणार पवित्र स्नान

बसंत पंचमी आणि मौनी आमवस्येचा दिवस पवित्र मानला जातो. 5 फेब्रुवारीला हे दोन्ही योग एकाच दिवशी जुळून येत असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. या दिवसाला माघ अष्टमी असं म्हणतात. हा दिवस तपश्चर्या, भक्ती आणि दान या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. म्हणूनच पंतप्रधान मोदी 5 तारखेला पवित्र शाहीस्नान करणार आहेत. 

या तीन गोष्टी करणं महत्त्वाचं मानलं जातं

पंचांगानुसार, माघ अष्टमी ही माघ महिन्यात गुप्त नवरात्रीच्या कालावधीमध्ये येते. या कालावधीमध्ये तपश्चर्या, दान आणि संगमावर स्थान करणं पवित्र मानलं जातं. या दिवशी तपश्चर्या केल्यास, दानधर्म केल्यास आणि संगमावर स्थान केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असं मानलं जातं. धार्मिक दृष्ट्‍याही माघ अष्टमीला विशेष महत्त्व आहे. आपला अध्यात्मिक स्तर वाढवण्यासाठी या दिवसाला अधिक महत्त्व दिलं जातं. या दिवशी धार्मिक कार्य केल्यास फार पुण्य लाभतं असं मानलं जातं. 

5 फेब्रुवारी महाभारताच्या दृष्टीनेही महत्त्वाचा दिवस कारण...

विशेष म्हणजे 5 फेब्रुवारी रोजी भीष्म अष्टमी सुद्धा आहे. महाभारतामधील हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. भीष्म पितामह आपल्या मृत्यू शय्येवर देह त्यागण्याआधी सूर्य उत्तरायणामध्ये प्रवेश करुन शुक्ल पक्ष सुरु होण्याची वाट पाहत होते. 

मोदींसाठी विशेष तयारी

माघ अष्टमीच्या दिवश पवित्र नद्यांच्या संगमावर स्थान करुन पितृ तर्पण केलं जातं. तीळ, भात आणि फुलं नदीत सोडणं पवित्र मानलं जातं. आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती आणि मुक्ती मिळावी म्हणून असं केलं जातं. तसेच जी व्यक्ती या गोष्टी करतात त्यांनाही मोक्ष सहज मिळतो असं म्हटलं जातं. त्यामुळेच 5 फेब्रुवारी रोजी महाकुंभमध्ये मोठ्याप्रमाणात भक्त सहभागी होतील असं मानलं जातं आहे. मोदींची ही भेट अविस्मरणीय होईल यासाठी सगळी तयारी उत्तर प्रदेश सरकारकडून कऱण्यात आली आहे.  

Read More