Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2025 : 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास, 35 चेंडूत ठोकले शतक

राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीची दमदार खेळी, सगळीकडे एकच चर्चा. 

IPL 2025 : 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास, 35 चेंडूत ठोकले शतक

जयपुरमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना तुफान रंगला. याला कारण ठरवा अवघ्या 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी. 

गुजरात टायटंस विरोधातील सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला आहे. 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने फक्त 35 चेंडूत शतक ठोकत एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. गुजरातने 211 धावांचं आव्हान दिल्यानंतर यशस्वी जैसवालसह वैभव सूर्यवंशी फलंदाजीला उतरला होता. पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांवर तुटून पडलेल्या वैभवने 17 चेंडूत अर्धशतक आणि 35 चेंडूत शतक ठोकत संपूर्ण क्रिकेटविश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. दमदार खेळी दाखवल्यानंतर वैभव सूर्यवंशी 37 चेंडूत 110 धावा करुन बाद झाला. वैभव बाद झाल्यानंतर चाहत्यांनी देखील टाळ्यांचा गडगडाट करत कौतुक केलं. 

इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या 47 व्या सामन्यात, गुजरात टायटन्स (GT) आज राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध सामना करणार आहे. गुजरात टायटन्स हा सामना जिंकण्यासाठी उत्सुक आहेत. पण राजस्थान रॉयल्सने केलेली सुरुवात ही लक्षवेधी ठरली. 

या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर राजस्थानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाने 209 धावा केल्या. गिलने 84 धावांची तुफानी खेळी केली. याला प्रत्युत्तर देत राजस्थानचा स्कोअर 12 षटकांनंतर 166-1 आहे. या सामन्यात 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने फक्त 35 चेंडूत शतक झळकावले आहे. यावेळी वैभव सूर्यवंशीने अवघ्या 37 चेंडूत 110 धावा केल्या. या दरम्यान वैभवने 11 षटकार आणि 7 चौकार लगावले. 

या सामन्या दरम्यान वैेभवला 'Boss Baby' म्हणून संबोधण्यात आलं. २१० धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल यांनी सलामीवीर म्हणून डावाची सुरुवात केली. १४ वर्षीय वैभवने फक्त १७ चेंडूत ६ षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. पण यानंतरही वैभव थांबला नाही आणि त्याने फक्त ३५ चेंडूत शतक झळकावले.

Read More