MI VS CSK : 20 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स (Mumbai Indians VS Chennai Superkings) यांच्यात सामना पार पडणार आहे. सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये झालेला टॉस मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या याने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी निवडली. चेन्नई सुपरकिंग्सने मुंबई विरुद्ध सामन्यात त्यांच्या प्लेईंग 11 मध्ये बदल केले आहेत. चेन्नई सुपरकिंग्सने अवघ्या 17 वर्षांच्या मराठमोळ्या आयुष म्हात्रे याला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी दिली आहे.
वानखेडे स्टेडीयमवर रविवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात टॉस पार पडला. हा टॉस मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या याने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी निवडली. तर चेन्नईला प्रथम फलंदाजीचे आव्हान मिळाले. मुंबई इंडियन्सने चेन्नई विरुद्ध सामन्यासाठी त्यांच्या प्लेईंग 11 मध्ये कोणतेही बदल केले नाहीत. तर चेन्नई सुपरकिंग्सने मात्र त्यांच्या बॅटिंग लाईनअपमध्ये बदल केला असून त्यांनी आयुष म्हात्रे याला पदार्पणाची संधी दिली आहे. आयुष म्हात्रेला राहुल त्रिपाठीच्या जागी प्लेईंग 11 मध्ये संधी देण्यात आली आहे.
हेही वाचा : IPL 2025 दरम्यान भारताच्या माजी कर्णधारावर मोठी कारवाई, स्टेडियमधील स्टॅन्डला देण्यात आलेलं नाव काढलं
युवा क्रिकेटर आयुष म्हात्रे हा मूळचा विरारचा रहिवासी असून तो सध्या 17 वर्षांचा आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या आयपीएल 2025 मेगा ऑक्शनमध्ये आयुष म्हात्रेने स्वतःला 30 लाखांच्या किंमतीवर लिस्ट केले होते. परंतु त्याला कोणत्याही संघाने खरेदी केली नाही. आयुष म्हात्रेने 9 फस्ट क्लास सामन्यांमध्ये खेळलेल्या 16 डावांत 504 धावा केल्या आहेत. आयुष म्हात्रेची सर्वोच्च धावसंख्या 176 धावा आहे. आयुष म्हात्रेने यामध्ये 2 शतके आणि 1 अर्धशतक झळकावले आहे. लिस्ट ए मध्ये त्याने 7 डावात 458 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 2 शतकं आणि 1 अर्धशतक झळकावले आहे.
Young MumBoy for the MI clash!
Chennai Super Kings (ChennaiIPL) April 20, 2025
Roar on, Ayush MIvCSK WhistlePodu Yellove pic.twitter.com/mb90g3dkqJ
रायन रिकेल्टन (विकेटकिपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्री
शेख रशीद, रचिन रवींद्र, आयुष म्हात्रे, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, विजय शंकर, जेमी ओव्हरटन, एमएस धोनी (कर्णधार), नूर अहमद, खलील अहमद, मथीशा पाथिराना