Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

17 वर्षांचा क्रिकेटर करू शकतो CSK कडून पदार्पण, मुंबई इंडियन्स विरुद्ध पहिली मॅच खेळणार?

MI VS CSK : मुंबईचा राहणारा 17 वर्षांचा आयुष म्हात्रे हा फलंदाज 20 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स सामन्यात पदार्पण करू शकतो. सीएसकेकडून त्याला संधी दिली जाऊ शकते. 

17 वर्षांचा क्रिकेटर करू शकतो CSK कडून पदार्पण, मुंबई इंडियन्स विरुद्ध पहिली मॅच खेळणार?

MI VS CSK : आयपीएल 2025 मधील राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स (RR VS LSG) सामन्यात 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला (Vaibhav Suryavanshi) आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. त्याने  संधीचं सोनं केलं आणि 34 धावा केल्या. यासह तो आयपीएलमध्ये खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. आता यानंतर वैभव सूर्यवंशीचा पार्टनर आयुष म्हात्रे याच सुद्धा आयपीएलमध्ये पदार्पण करण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. मुंबईचा राहणारा 17 वर्षांचा आयुष म्हात्रे (Ayush Mhatre) हा फलंदाज 20 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स सामन्यात पदार्पण करू शकतो. सीएसकेकडून त्याला संधी दिली जाऊ शकते. 

चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड हा दुखापतग्रस्त झाल्याने तो आयपीएल 2025 च्या संपूर्ण सीजनमधून बाहेर पडला. तेव्हा त्याची रिप्लेसमेंट म्हणून मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा आयुष म्हात्रे याला सिएसकेने करार बद्ध केलं. सध्या चेन्नई सुपरकिंग्स आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये 7 सामन्यांपैकी केवळ 2 सामने जिंकून प्रथम स्थानावर आहे. त्यांचा आठवा सामना ते रविवार 20 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे. 

स्टीफन फ्लेमिंग काय म्हणाला? 

 

चेन्नई सुपरकिंग्सचा कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी म्हटले की, 'आमच्या खेळाडूंना लयीत येण्यासाठी अधिक वेळ देणे आणि चांगले निकाल मिळवणे यामध्ये संतुलन साधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. दुर्दैवाने, आपण ज्या परिस्थितीत आहोत, तिथे धीर धरण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. दुसरीकडे, जादूचे सूत्र शोधण्याच्या प्रयत्नात आपल्याला सतत बदल करायचे नाहीत. स्टीफन फ्लेमिंग पुढे म्हणाला की, आम्ही या सीजन सोबतच थोडा पुढचा विचार सुद्धा करत आहोत. आम्ही भविष्यासाठी खेळाडू तयार करू इच्छितो. जर पुढील काही सामन्यात परिस्थिती सुधारली नाही तर नवे खेळाडू मैदानात दिसू शकतात'. 

हेही वाचा : 'मला तुझ्या सोबत झोपायचंय...' संजय बांगरच्या मुलीसोबत कोणी केलं होतं नीच कृत्य?

 

स्टीफन फ्लेमिंगच्या बोलणयावरून असं म्हटलं जातंय की, जर सीएसकेला युवकांना संधी द्यायची असेल तर आयुष म्हात्रे आणि डेवाल्ड ब्रेविस हे यात सर्वात पुढे असतील. 17 वर्षांचा आयुष म्हात्रे हा भारताच्या अंडर 19 संघाकडून खेळतोय. मुंबईसाठी सुद्धा त्यांनी चांगलं प्रदर्शन केलं. दक्षिण आफ्रिकेचा 'बेबी एबी' म्ह्णून ओळखला जाणारा डेवाल्ड ब्रेविस याला सुद्धा चेन्नईकडून संधी मिळू शकते. 

कोण आहे आयुष म्हात्रे?

युवा क्रिकेटर आयुष म्हात्रे हा मूळचा विरारचा रहिवासी असून तो सध्या 17 वर्षांचा आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या आयपीएल 2025 मेगा ऑक्शनमध्ये आयुष म्हात्रेने स्वतःला 30 लाखांच्या किंमतीवर लिस्ट केले होते. परंतु त्याला कोणत्याही संघाने खरेदी केली नाही. आयुष म्हात्रेने 9 फस्ट क्लास सामन्यांमध्ये खेळलेल्या 16 डावांत 504 धावा केल्या आहेत. आयुष म्हात्रेची सर्वोच्च धावसंख्या 176 धावा आहे. आयुष म्हात्रेने यामध्ये 2 शतके आणि 1 अर्धशतक झळकावले आहे. लिस्ट ए मध्ये त्याने 7 डावात 458 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 2 शतकं आणि 1 अर्धशतक झळकावले आहे.

Read More