Kimaya Karle’s 23.000: ठाण्याची 18 वर्षीय रिदमिक जिमनास्ट किमया कार्ले हिने रोमानियातील कलूज-नापोका येथे पार पडलेल्या एफआयजी वर्ल्ड चॅलेंज कप स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करताना दमदार कामगिरी करत इतिहास घडवला आहे. ही स्पर्धा 25 ते 28 जुलै दरम्यान बीटी अरेना कॉम्पिटिशन हॉलमध्ये पार पडली. किमयाने ‘क्लब्ज’ प्रकारात २३.०० गुण मिळवत भारतासाठी आजवरचं सर्वोच्च गुणांकन नोंदवलं आहे. यासह ती अशा प्रकारचं गुणांकन मिळवणारी भारताची पहिली जिमनास्ट ठरली आहे. विशेष म्हणजे, ही स्पर्धा 2025-28 या ऑलिम्पिक सायकलमधील सहावी वर्ल्ड सिरीज स्पर्धा होती.
किमयाने केवळ ‘क्लब्ज’ नव्हे तर ‘बॉल रुटीन’च्या सादरीकरणातूनही प्रेक्षकांची मन जिंकले. तिच्या परफॉर्मन्सने एवढा प्रभाव पाडला की एफआयजीच्या मीडियातर्फे सौ. अॅना कुल यांनी तो परफॉर्मन्स त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर शेअर केला. या संपूर्ण रुटीनची कोरिओग्राफी तिच्या प्रशिक्षिका सौ. मानसी सुर्वे गावंडे यांनी तयार केली होती. किमया गेली १४ वर्षे प्रशिक्षण घेत असून, ती आता आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतासाठी महत्त्वाची उमेद बनली आहे.
या स्पर्धेसाठी भारताकडून कोच म्हणून सौ. मानसी सुर्वे गावंडे, जज म्हणून सौ. पूजा सुर्वे, तर शिष्टमंडळ प्रमुख म्हणून श्रीमती नीतू बाला जी यांची नियुक्ती झाली होती. किमया व्यतिरिक्त वैभवी शर्मा (जम्मू-काश्मीर) हिचाही संघात समावेश होता. सौ. पूजा सुर्वे या खुद्द भारताच्या आंतरराष्ट्रीय जिमनास्ट, शिव छत्रपती पुरस्कार विजेत्या असून त्या सध्या ‘पूजा ट्रस्ट’ च्या विश्वस्तही आहेत.
KIMAYA KARLE CREATES HISTORY!
— The Khel India (@TheKhelIndia) July 29, 2025
Kimaya became the first ever Indian rhythmic gymnast to cross the historical benchmark of 23.000 in club events during current olympic cycle!
Incredible Milestone at FIG World Challenge Cup
WELL DONE!
pic.twitter.com/CBvyJtK3X0
या यशस्वी प्रवासात ठाणे जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशन, SBPM स्पोर्ट्स अकॅडमी, आर्य क्रीडा मंडळ, आणि श्रीरंग विद्यालय यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.