1998 Test Match Sabina Park: कसोटी क्रिकेटच्या इतिहासातला सर्वात छोटा सामना 1998 साली वेस्टइंडीज आणि इंग्लंड यांच्यात खेळवण्यात आला होता. हा सामना फक्त 62 चेंडूंमध्ये म्हणजेच 10.2 षटकांतच थांबवण्यात आला. भयानक खेळपट्टीमुळे फलंदाजांच्या जीवाला धोका असल्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला होता. कारण फलंदाजांना हा सामना खेळताना अडचणी येत होत्या. फलंदाजांना खेळताना रक्त येत असल्यामुळे ते आपला जीव वाचवताना दिसत होते. हा सामना वेस्टइंडीजने आयोजित केला होता. हा सामना सबीना पार्क स्टेडियम येथे खेळवण्यात आला होता.
यावेळी इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, तेथील मैदान हे खूपच घातक होते. त्यामुळे इंग्लंडचे फलंदाज रक्तबंबाळ झाले होते. कारण बॉल थेट फलंदाजांच्या अंगावर आदळत होता.
10.2 षटकांत संपला होता हा सामना
इंग्लंडकडून कॅप्टन माइक अर्थटन आणि विकेटकीपर एलक स्टीवर्ट हा होता. त्यावेळी वेस्टइंडीजची गोलंदाजी खूपच प्रसिद्ध होती. कर्टली एंब्रोस आणि कर्टनी वॉल्श हे दोघेही वेगवान गोलंदाज होते. त्यांनी जबरदस्त वेगाने आणि उंच उछाल देणाऱ्या चेंडूंनी इंग्लंडच्या फलंदाजांना अक्षरश: हैराण केलं. बॉल अंगावर लागत होता आणि फलंदाज रक्तबंबाळ झाले होते.
दरम्यान, त्या दिवशी सबीना पार्क स्टेडियमवर एक वेगळीच उसळी आणि वेग होता. त्यामुळे चेंडू हा थेट फलंदाजांच्या शरीरावर आदळत होता. त्यामुळे तेथील फलंदाजासह इतर खेळाडूंनाही दुखापत झाली होती. खेळपट्टी खूपच प्राणघातक बनली होती. इंग्लंडचे फलंदाज रक्तबंबाळ झाले होते.
टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लहान सामना
या सर्व गोष्टी लक्षात घेता तेथे असणाऱ्या अंपायर स्टीव बकनर आणि श्रीनिवास वेंकटराघानने हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, ज्यावेळी अंपायर यांनी हा निर्णय घेतला त्यावेळी खूप उशीर झाला होता. इंग्लंडचे काही फलंदाजांना दुखापत झाली होती. त्यांच्या शरीरावर दुखापतीच्या खुणा दिसत होत्या. तेथील मैदान हे इतके खराब होते की, अंपायर यांना हा सामना 62 चेंडूमध्येच संपवावा लागला. फक्त 10 ओवर आणि 2 चेंडूत हा सामना संपला. ज्यामध्ये इंग्लंडने 3 विकेट गमावून फक्त 17 धावा केल्या होत्या. हा सामना क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात छोटा सामना ठरला. इतका भयानक अनुभव क्वचितच क्रिकेटच्या इतिहासात बघायला मिळाला.