Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये पहिल्यांदा क्वालिफाय झाला 'हा' संघ, भारत - ऑस्ट्रेलियाला देणार टक्कर

T20 World Cup 2026 : टी 20 वर्ल्ड कप 2026 भारत आणि श्रीलंका येथे पार पडणार असून टी 20 फॉरमॅटमधील सर्वात मोठ्या स्पर्धेसाठी एका नव्या संघाने सुद्धा क्वालिफाय केलं आहे 

T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये पहिल्यांदा क्वालिफाय झाला 'हा' संघ, भारत - ऑस्ट्रेलियाला देणार टक्कर

T20 World Cup 2026 : काही महिन्यांपूर्वी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने (Team India) न्यूझीलंडला पराभूत करून सलग दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकली. त्यानंतर आता क्रिकेट प्रेमींना पुढच्या वर्षी खेळवण्यात येणाऱ्या आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 ची (T20 World Cup 2026) आहे.  हा वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंका या देशांमध्ये आयोजित केला जाईल. या आयसीसी वर्ल्ड कपसाठी प्रथमच इटलीचा पुरुष क्रिकेट संघ क्वालिफाय झालेला आहे. फुटबॉलचं मैदान गाजवणारा हा संघ आता क्रिकेटमधील सर्वात मोठ्या टी 20 स्पर्धेत सहभागी होऊन इथेही नावाजलेल्या संघांना टक्कर देण्यासाठी सज्ज झालेला आहे.  

इटलीने यूरोपीय क्वालिफायरमध्ये जबरदस्त प्रदर्शन केलं. ज्यामुळे त्यांनी टी 20 वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळवलं. इटलीचं नाही तर नेदरलँडने सुद्धा या स्पर्धेसाठी क्वालिफाय केलं असून अशी कामगिरी करणारा हा दुसरा संघ ठरला आहे. क्वालीफायरचा शेवटचा दिवस हा अत्यंत रोमांचक होता कारण टी 20 वर्ल्ड कप 2026 मध्ये क्वालिफाय करण्यासाठी ऐकू 4 संघ शर्यतीत होते. 

हेही वाचा : IND VS ENG Test : 'बगुंडी रा मावा'... 4 बॉलमध्ये 2 विकेट घेताच नितीश रेड्डीवर इम्प्रेस झाला कॅप्टन गिल, तेलगूमध्ये हे काय बोलून गेला?

 

इटलीने नेट रन रेटच्या आधारावर जेसीला मागे सोडून वर्ल्ड कपमध्ये आपली जागा निश्चित केली. इटलीला नेदरलँड विरुद्ध अंतिम सामन्यात पराभूत होऊनही टी 20 वर्ल्ड कपमध्ये जागा मिळाली. इटलीने नेदरलँडला १४ व्या ओव्हरमध्ये विजयाचं लक्ष पूर्ण करण्यापासून रोखलं. नेदरलँडने जरी हा सामना 9 विकेटने जिंकला असला तरी इटलीने हे सुनिश्चित केले की 17 व्या ओव्हरपर्यंत हा सामना खेळला जावा ज्यामुळे ते वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय करू शकतील. 

रचला नवा अध्याय : 

इटलीने फक्त टी 20 वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय झालेली नाही तर त्यांनी देशाच्या क्रिकेटमध्ये एक नवा अध्याय रचला आहे. इटलीचा क्रिकेट संघ पहिल्यांदाच क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमधील आयसीसी वर्ल्ड कप 2026 चा भाग होत आहे. हे दर्शवते की लहान देश सुद्धा कशा प्रकारे त्याच्या रणनीती आणि मेहनतीने क्रिकेटच्या मोठ्या स्पर्धांमध्ये स्थान मिळवू शकतात. इटली आता 2026 मध्ये भारत आणि श्रीलंका येथे होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांसारख्या सर्वोत्कृष्ट संघांशी दोन हात करेल. 

Read More