Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

धक्कादायक! हैदराबादमध्ये बॅडमिंटन खेळताना 25 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, Video आला समोर

Hyderabad badminton player heart attack: हैदराबादमध्ये बॅडमिंटन खेळताना 25 वर्षीय खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असून या दुर्दैवी घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.   

धक्कादायक!  हैदराबादमध्ये बॅडमिंटन खेळताना 25 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, Video आला समोर

Badminton Player Died: हैदराबादमधून एक अत्यंत दुर्दैवी घटना अमोर आली आहे. नागोले स्टेडियममध्ये मित्रांसोबत बॅडमिंटन खेळताना 25 वर्षीय तरुणाचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला असून, अनेकांना धक्का बसला आहे. 

कोण आहे हा तरुण खेळाडू?

मृत युवकाचं नाव गुंडला राकेश असून, तो खम्मम जिल्ह्यातील तल्लाडा गावचे माजी उपसरपंच गुंडला वेंकटेश्वरलू यांचा मुलगा होता. हैदराबादमधील एका खाजगी कंपनीत तो नोकरी करत होता.  बॅडमिंटन खेळताना अचानक अस्वस्थ झाल्यावर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

तरुणांमध्ये वाढतेय हृदयविकाराचं प्रमाण!

गुंडला राकेशच्या मृत्यूनं अनेक मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. अचानक येणाऱ्या या हार्ट अटॅकचे कारण समजत नाहीये. गेल्या काही वर्षांपासून तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यांमुळे होणारे मृत्यू चिंतेचा विषय बनले आहेत. नियमित व्यायाम करणारे, दिसायला तंदुरुस्त असलेले अनेक तरुण अचानक कोसळून मृत्यूमुखी पडताना पाहायला मिळत आहेत.

हृदयविकाराचा झटका कसा येतो?

हृदयात अचानक रक्तपुरवठा बंद पडल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. हे सामान्यतः हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे घडतं. जेव्हा हृदयाला पुरेसं ऑक्सिजनयुक्त रक्त मिळत नाही, तेव्हा पेशी मृत्युमुखी पडतात आणि त्यामुळे गंभीर स्थिती निर्माण होते. ही स्थिती बहुतेक वेळा कोणतीही लक्षणं न देता अचानक घडते. हृदयविकाराच्या झटक्याचं पूर्वलक्षण अनेक वेळा शरीर देत असतं,  जसे की छातीत दुखणं, दम लागणं, थकवा जाणवणं  मात्र अनेक वेळा ही लक्षणं दुर्लक्षित केली जातात. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, आधुनिक जीवनशैली, तणाव, अयोग्य आहार आणि झोपेच्या सवयी यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो आहे.

 

गुंडला राकेशसारख्या तरुणाचा मृत्यू हा एक मोठा इशारा आहे. व्यायाम करत असतानाही आपण आपल्या हृदयाच्या आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. नियमित तपासण्या, संतुलित लाइफस्टाइल आणि वेळचं निदान यावरच उपाय आहे.

 

Read More