Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs ENG: कधी निष्काळजीपणा तर कधी आडवे तिडवे शॉट्स... टीम इंडियाच्या लॉर्ड्सवरील पराभवाची 5 कारणं

IND VS ENG 3rd Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून याच्यातील तिसरा सामना हा लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला गेला. यात भारताचा इंग्लंडने 22 धावांनी पराभव केला.   

IND vs ENG: कधी निष्काळजीपणा तर कधी आडवे तिडवे शॉट्स... टीम इंडियाच्या लॉर्ड्सवरील पराभवाची 5 कारणं

IND VS ENG 3rd Test : भारत आणि इंग्लंड (India VS England) यांच्यात लॉर्ड्समध्ये रोमांचक टेस्ट सामना पाहायला मिळाला. यात शेवटच्या दिवशी इंग्लंडने भारतावर 22 धावांनी विजय मिळवला. तर इंग्लंडने सीरिजमध्ये 2-1 ने विजयी आघाडी घेतली. शेवटच्या दिवशी भारताकडे 6 विकेट शिल्लक होते तर विजयातही फक्त 135 धावांची आवश्यकता होती, पण तरीही टीम इंडिया हे आव्हान पूर्ण करू शकली नाही. तेव्हा टीम इंडियाच्या (Team India) लॉर्ड्सवरील पराभवाची 5 कारणं जाणून घेऊयात. 

यशस्वी जयस्वाल :

यशस्वी जयस्वाल दोन्ही इनिंगमध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीचा शिकार ठरला. आर्चरच्या गोलंदाजीमुळे यशस्वी जयस्वाल पहिल्या इनिंगमध्ये शून्यावर बाद झाला तर दुसऱ्या इनिंगमध्ये 13 धावांवर बाद झाला. 

करुण नायर : 

करुण नायर याला 6 इनिंगमध्ये खेळण्याची संधी मिळावी पण तो अपेक्षांवर खरा उतरू शकला नाही. लॉर्ड्स टेस्टमध्ये सुद्धा नायरची फलंदाजी चालली नाही. पहिल्या इनिंगमध्ये त्याने 40 धावांची कामगिरी केली पण दुसऱ्या इनिंगमध्ये तो अपयशी ठरला. 

हेही वाचा : लॉर्ड्सवरील विजयानंतर इंग्लंडला मोठा धक्का, स्टार गोलंदाज सीरिजमधून बाहेर, जडेजा ठरला कारणीभूत

 

आकाश दीप :

आकाश दीप आपल्या गोलंदाजी सह बॅटिंगसाठी सुद्धा ओळखला जातो. दुसऱ्या इनिंगमध्ये त्याच्यावर मोठा विश्वास ठेऊन त्याला ५ व्या क्रमांकावर फलंदाजी करायला सोडलं होतं. पण तो केवळ 7 धावा करून बाद झाला. आकाश दीपच्या विकेटनंतर भारतवरचं प्रेशर दुप्पट वाढलं. 

ऋषभ पंत :

ऋषभ पंत हा सुद्धा भारताच्या पराभवासाठी कारणीभूत ठरला असं म्हणता येईल. पहिल्या इनिंगमध्ये त्यानं 74 धावा केल्या, पण दुसऱ्या इनिंगमध्ये तो जोफ्रा आर्चरच्या बॉलवर बाद झाला. पंत दुसऱ्या इनिंगमध्ये फक्त 9 धावा करू शकला. जर पंतने जडेजा किंवा राहुल सोबत चांगली भागीदारी केली असती तर भारताला विजयाचं आव्हान पूर्ण करण्यात यश आलं असतं. 

कॅप्टन शुभमन गिलने कोणाला ठरवलं जबाबदार?

शुभमन गिल पत्रकार परिषदेत टीम इंडियाच्या पराभवाबाबत बोलताना म्हणाला की, ' आम्हाला गर्व आहे की टेस्ट क्रिकेट एवढ्या जवळून खेळण्याची संधी मिळाली. आज सकाळी आम्ही खूप आत्मविश्वासाने आलो होतो. आमची फलंदाजी बाकी होती, पण आम्ही त्यात यशस्वी होऊ शकलो नाही. काही मोठी पार्टनरशिप व्हायला हवी होती, जी आम्ही करू शकलो नाही. पण त्यांनी आमच्यापेक्षा नक्कीच चांगला खेळ दाखवला'. 

Read More