Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

पाकिस्तानची झाली गोची! आयपीएलनंतर 'या' क्रिकेट लीगमध्येही खेळाडूंना नो एंट्री, तब्बल 50 खेळाडू राहिले Unsold

Cricket News : जगातील सर्वात मोठ्या टी 20 लीगपैकी एक असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगमधून काही वर्षांपूर्वीच पाकिस्तानच्या खेळाडूंना बॅन करण्यात आलंय. आता आयपीएल प्रमाणेच क्रिकेट जगतातील अजून एका लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना नो एंट्री करण्यात आली आहे. 

पाकिस्तानची झाली गोची! आयपीएलनंतर 'या' क्रिकेट लीगमध्येही खेळाडूंना नो एंट्री, तब्बल 50 खेळाडू राहिले Unsold

Cricket News : पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंची खराब कामगिरी त्यांच्यासाठी आता अडचणीची ठरत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील खराब परफॉर्मन्स आणि भारता विरुद्ध दिलेले स्टेटमेंट आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी (Pakistan Cricket Board) जोडलेल्या अनेक खेळाडूंवर भारी पडले आहेत. जगातील सर्वात मोठ्या टी 20 लीगपैकी एक असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगमधून काही वर्षांपूर्वीच पाकिस्तानच्या खेळाडूंना बॅन करण्यात आलंय. आता आयपीएल (IPL) प्रमाणेच क्रिकेट जगतातील अजून एका लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना नो एंट्री करण्यात आली आहे. नसीम शाह, सइम अयूब आणि शादाब खान इत्यादी पाकिस्तानचे टॉप क्रिकेटर्स इंग्लंडच्या द हंड्रेड लीगच्या (The Hundred) ड्राफ्टमध्ये अनसोल्ड ठरेल. 

पाकिस्तानच्या एकूण 50 क्रिकेटर्सनी द हंड्रेड लीगसाठी नाव नोंदवले होते. नसीम आणि शादाब यांनी टॉप कॅटेगरीमध्ये स्वतःच नाव नोंदवलं होतं ज्याची किंमत 120000 पाउंड होती. तर अयूबने 78500 पाउंड वाल्या कॅटेगरीमध्ये आपलं नाव नोंदवलं होतं. तर महिला क्रिकेटरमध्ये आलिया रियाज, फातिमा सना, युसरा आमिर, इरम जावेद आणि जावेरिया रऊफ सारख्या खेळाडूंचा समावेश होता. मात्र या स्टार खेळाडूंनाही कोणत्याही टीमने खरेदी केले नाही. इंडियन प्रीमियर लीग मधील संघांच्या मालकांनी द हंड्रेड संघांमध्ये भागभांडवल खरेदी करणे हे यामागचे एक कारण असू शकते.

हेही वाचा :  IPL पूर्वी मुंबई, लखनऊ, राजस्थान संघांना मोठा धक्का! 'या' स्टार खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत शंका

 

सध्या आयपीएलमधील मुंबई इंडियन्स (ओवल इंविंसिबल्स), लखनऊ सुपर जाएंट्स (मॅनचेस्टर ओरिजिनल्स), सनराइजर्स हैदराबाद (नार्दर्न सुपरचार्जर्स) आणि दिल्ली कॅपिटल्स (सदर्न ब्रेव) या संघांनी द हंड्रेड लीगमधील संघांमध्ये भागीदारी घेतलेली आहे. याशिवाय भारतीय वंशाचे अमेरिकेचे उद्योजक संजय गोविल यांनी वेल्श फायरमध्ये 50 टक्के भागीदारी घेतली आहे. तसेच पाकिस्तानी खेळाडूंचा लिमिटेड ओव्हर टूर्नामेंटमध्ये असलेला खराब फॉर्म हा सुद्धा त्यांना न खरेदी करण्यामागचं कारण आहे. 

'द हंड्रेड' लीगचा हा पहिला सीजन असेल जेव्हा इंग्लंडच्या प्रमुख टी20 लीमध्ये फ्रेंचायझींची भागीदारी विकली गेली आहे. यापैकी चार फ्रेंचाइजी या आता काही प्रमाणात किंवा पूर्णपणे आयपीएल फ्रेंचाइजींच्या मालकीची आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की दक्षिण आफ्रिका, यूएई आणि अमेरिकेत संघ असलेल्या भारतीय फ्रँचायझींनी क्वचितच त्यांच्या संघात पाकिस्तानी खेळाडूची निवड केली आहे आणि 'द हंड्रेड'मध्येही असेच घडू शकते अशी चिंता यापूर्वीच काही क्रिकेट विश्लेषकांनी वर्तवली होती.

ईसीबीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड गूल्ड आधी आश्वासन दिले होते की 'द हंड्रेड' लीगमध्ये आयपीएल फ्रेंचायझीचा प्रभावा पाकिस्तानी खेळाडूंना सीमित करणार नाही. 2008 च्या आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंची निवड करण्यात आली होती. मात्र 2009 रोजी झालेल्या आतंगवादी हल्ल्यानंतर आयपीएलमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंवर बॅन लावण्यात आला. 

Read More