Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Sourav Ganguly: 6 वर्षांनंतर पुन्हा अध्यक्षपदावर येणार सौरव गांगुली? 'दादा'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!

Sourav Ganguly CAB President: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली पुन्हा एकदा क्रिकेट प्रशासनात परतू शकतात.  

Sourav Ganguly: 6 वर्षांनंतर पुन्हा अध्यक्षपदावर येणार सौरव गांगुली? 'दादा'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!

Sourav Ganguly CAB President: टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली पुन्हा एकदा क्रिकेट प्रशासनात कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार गांगुली लवकरच बंगाल क्रिकेट असोसिएशन (CAB) चे अध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा कार्यभार स्वीकारू शकतात. सौरव गांगुलीचा पहिला कार्यकाल 2015 ते 2019 दरम्यान होता. त्यानंतर त्यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली होती. सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशन (CAB)  च्या अध्यक्षपदी त्यांचा भाऊ स्नेहाशीष गांगुली आहेत. मात्र, लवकरच ही जबाबदारी पुन्हा सौरवकडे सोपवली जाऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे.

कोणताही विरोधक नसण्याची शक्यता?

गांगुली पुन्हा अध्यक्ष होतील का? याबद्दल औपचारिक घोषणा अजून झाली नसली तरी रिपोर्ट्सनुसार त्यांना या पदासाठी कोणताही मोठा विरोधक समोर येणार नाही. याआधी बंगाल क्रिकेट असोसिएशन (CAB) ने त्यांना परत आणण्याचा प्रयत्न केला होता, पण ते अयशस्वी ठरले होते. यावेळी मात्र गांगुलीच पुन्हा अध्यक्ष होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बीसीसीआय कार्यकाळात वादांनी भरलेलं?

गांगुलीचा बीसीसीआय अध्यक्ष म्हणून कार्यकाळ वादांनी भरलेला होता. त्यावेळी विराट कोहलीसोबत त्यांचे मतभेदही चर्चेत आले होते. त्याच काळात विराटने टेस्ट कर्णधारपद सोडलं होतं. त्यांच्या अध्यक्षीय काळात भारत दोनदा T20 वर्ल्ड कप जिंकण्यात अपयशी ठरला आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही पराभव पत्करावा लागला.

IPLमध्ये गांगुलीची भूमिका संपणार?

जर गांगुली पुन्हा CAB अध्यक्ष झाले, तर त्यांना IPL फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्समधील जबाबदारी सोडावी लागेल. IPL 2025 हंगामाआधीच त्यांचं क्रिकेट डायरेक्टरपद वेणुगोपाल रावकडे गेलं होतं. मात्र, गांगुली WPLमध्ये दिल्ली कॅपिटल्ससोबत आणि SA20 लीगमध्ये प्रिटोरिया कॅपिटल्ससोबतही कार्यरत होते.

सौरव गांगुली पुन्हा एकदा बंगाल क्रिकेटच्या नेतृत्वात परत येण्याची शक्यता आहे. ‘दादा’च्या पुनरागमनामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे आणि बंगाल क्रिकेटसाठी हा एक मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो.

Read More