IPL 2025: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आकाश चोप्रा गुजरात टायटन्सचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने सनरायजर्स हैदराबादविरोधात केलेल्या खेळीमुळे प्रभावित झाला आहे. वॉशिंग्टन सुंदरमध्ये कौशल्य असतानाही आयपीएल संघांकडून त्याला योग्य वागणूक देण्यात आली नाही असा आरोप आकाश चोप्राने Jio Hotstar शी बोलताना केला आहे. गुजरात टायटन्सच्या संघात वॉशिंग्टनचा समावेश केल्याने त्यांना डावखुरा फलंदाजीचा एक मौल्यवान पर्याय मिळाला असून फलंदाजीच्या क्रमातील खोली वाढली असल्याचं आकाश चोप्राने म्हटलं आहे.
"वॉशिंग्टन सुंदर बराच काळ सनरायजर्स हैदराबाद संघात होता. त्यांनी त्याच्यासाठी 8 कोटी मोजले आणि यानंतरही त्याला योग्य संधी दिली नाही. गुजरात टायटन्स संघानेही त्याला घेतलं पण आजपर्यंत एकाही सामन्या संधी दिली नाही. आजही त्याला गोलंदाजी मिळाली नाही. आयपीएल स्तरावर ज्याप्रकारे त्याला हाताळलं जात आहे ते वाईट आहे. "पण गुजरात आणि वॉशिंग्टन दोघांच्याही दृष्टिकोनातून मला जे रोमांचक आणि प्रभावी वाटले ते म्हणजे तो आता त्यांना आणखी एक पर्याय देतो. त्यांच्या टॉप तीनमध्ये त्यांना आता आणखी एक डावखुरा फलंदाज मिळाला आहे. साई सुधरसन, त्यानंतर राहुल तेवतिया आमि आता, वॉशिंग्टन सुंदरसह, त्यांच्याकडे आणखी एक डावखुरा पर्याय आहे," असं आकाश चोप्राने म्हटलं.
वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजी कौशल्याला कमी लेखलं जात असून, तो पॉवरप्लेमधील महत्त्वाचा खेळाडू ठरु शकतो असंही आकाश चोप्रा म्हणाला. आकाश चोप्रा भविष्यात फलंदाजी आणि गोलंदाजीत महत्त्वाची भूमिका निभावू शकतो असंही त्याने म्हटलं आहे.
"इशांत शर्माने त्याची पूर्ण षटके टाकली, खूप धावा दिल्या आणि तरीही वॉशिंग्टनची गरजच नव्हती म्हणून गोलंदाजी कमी होत नाही. तरीही, त्यांनी विरोधी संघाला 153 पर्यंत मर्यादित ठेवलं. याचा अर्थ त्यांची गोलंदाजीची खोली चांगली आहे. मला वाटतं की आपण येथून पुढे वॉशिंग्टनला आणखी बरेच सामने खेळताना पाहू आणि गोलंदाजीतही मोठी भूमिका बजावेल. त्याची गोलंदाजी खूपच कमी लेखली जात आहे. पॉवरप्लेमध्ये त्याला नवीन चेंडू द्या, आणि तुम्हाला तो फायदेशीर वाटेल," असंही तो पुढे म्हणाला.
गुजरात टायटन्स 16/2 अशा धावसंख्येवर असताना वॉशिंग्टन चौथ्या षटकात मधल्या फळीत आला. त्यावेळी संघाने त्यांचे दोन अनुभवी फलंदाज, साई सुदर्शन (5) आणि जोस बटलर (0) हे खूपच स्वस्तात गमावले. कर्णधार शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि शेरफेन रुदरफोर्ड यांनी चांगली खेळी केल्याने सनरायजर्स हैदराबादचा पराभव झाला.