पर्थ : पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्या काल वर्ल्डकपच्या स्पर्धेत सामना रंगला होता. पर्थच्या मैदावावर हा सामना रंगला होता. या सामन्यात एका रन्सने झिम्बाब्वेने पाकिस्तानचा पराभव केला. अवघ्या 131 रन्सचं लक्ष्य पाकिस्तानला गाठणं शक्य झालं नाही. दरम्यान या सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होतोय. या व्हिडीओमध्ये बाबर शिविगाळ करताना दिसतोय.
पहिल्यांदा फलंदाजी करताना झिम्बाव्बेने पाकिस्तानला 131 रन्सचं टारगेट दिलं होतं. यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांना 129 पर्यंतच मजल मारता आली. शेवटच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानला जिंकण्यासाठी 11 रन्सची आवश्यकता होती. मात्र अवघे 9 रन्स करता आल्याने पाकिस्तानचा पराभव झाला. यानंतर ड्रेसिंग रूममधील बाबरचा व्हिडीओ व्हायरल होत असून तो यामध्ये त्याच्या साथीदारांना शिविगाळ करताना दिसतोय.
मात्र कर्णधार बाबर आझमचा हा व्हिडीओ एडिटेड आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानला जोरदार ट्रोल केलं जातंय. पाकिस्तानी चाहते त्यांच्या टीमवर प्रचंड नाराज आहेत. त्याचवेळी भारतीय फॅन्सने पाकिस्तान टीम्सवर मीम्स तयार करूनचा आनंद लुटला आहे.
बाबर आझमसोबत अष्टपैलू मोहम्मद नवाजही सोशल मीडियावर ट्रोल होतोय. एका मीम पेजने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केलाय. ज्यामध्ये बाबर आझम ड्रेसिंग रूममध्ये आपल्या टीमशी बोलताना दिसतोय. बाबरने नवाजचं नाव घेताच मागून दुसरा ऑडिओ वाजतो. ज्यामध्ये शिविगाळ केल्याचा आवाज येतोय.
Honest babar azam
— DK Popa (@DK_Popa_) October 27, 2022
Headphones Recommended pic.twitter.com/i3mlVeyJBd
या सामन्यात पाकिस्तानची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरताना दिसली. पाकिस्तानचा सलामीवीर बाबर आझम 9 बॉल्समध्ये केवळ 4 रन्स करू शकला, तर मोहम्मद रिझवानने 16 बॉल्ममध्ये 14 रन्स करू शकला. पाकिस्तानकडून शान मसूदने 44 रन्स केले. त्याच्याशिवाय एकाही फलंदाजाला 30 रन्सचा टप्पाही स्पर्श करता आला नाही. दुसरीकडे झिम्बाब्वेकडून सिकंदर रझाने ३ विकेट्स घेतलेत.
पर्थच्या मैदानावर रंगलेला हा सामना खूप रोमांचक ठरला. या सामन्यात अखेर झिम्बाब्वेने बाजी मारली. पहिल्यांदा फलंदाजी करत झिम्बाब्वेने 8 विकेट्स गमावत 130 रन्स केले. तर 131 रन्सचा पाठलाग करताना पाकिस्ताननेही 8 विकेट्स गमावत 129 रन्स केले.