Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

अफगाणिस्तानच्या खेळाडूने सचिनबद्दल केलं ‘हे’ वक्तव्य

सचिनच्या चाहत्यांच्या संख्येत आणखी एका नावाची भर, असं म्हणायला हरकत नाही. 

अफगाणिस्तानच्या खेळाडूने सचिनबद्दल केलं ‘हे’ वक्तव्य

मुंबई : सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वात अग्रस्थानी असणाऱ्या गोलंदाजांमध्ये अफगाणिस्तानच्या राशिद खानचा समावेश होतो. गेल्या काही काळापासूनचा त्याचा खेळ पाहता राशिद येत्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतात इतर पट्टीच्या गोलंदाजांना चांगलीच टक्कर देणार असल्याचच स्पष्ट होत आहे. खेळपट्टीवर आपल्या अफलातून फिरकी गोलंदाजीने विरोधी संघातील फलंदाजालाही पेचात पाडणाऱ्या राशिदने अतिशय लक्षवेधी वक्तव्य केलं आहे.

सोशल मीडियावर सचिनचा क्रिकेट विश्वातील सर्वात महान फलंदाज म्हणून उल्लेख करत राशिदने त्याचे आभार मानले. निमित्त होतं ते म्हणजे राशिदच्या वाढदिवसाचं.

खुद्द सचिननेच राशिदला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सचिनच्या ट्विटलाच उत्तर देत त्याने हे लक्षवेधी वक्तव्य केलं.

दरम्यान, सध्याच्या घडीला सहसा फलंदाजांच्या यादीत महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली या भारतीय क्रिकेटपटूंना अनेकांकडून पसंती दिली जाते. पण, राशिदने मात्र सचिनच सर्वात महान फलंदाज असल्याचं सांगत एक प्रकारे त्याची आवडही सर्वांसमोर स्पष्ट केली आहे, असंच म्हणावं लागेल.

Read More