हरिश मालुसरे, झी मीडिया, Rashid Khan reaction on Australia ODI Decision : ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने अफगाणिस्तानविरूद्धची वनडे मालिका खेळणार नसल्याचं सांगितलं. बोर्डाच्या या क्रिकेट वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडालेली पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियाच्या बोर्डाने घेतलेल्या या निर्णयावर अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू आणि कर्णधार राशिद खानने नाराजी व्यक्त केली आहे. राशिदनेही एक पोस्ट करत स्वत:चाच नाहीतर देशाचा स्वाभिमान जपला आहे. (afghanistan captain rashid khan slams cricket australias withdrawal afghanistan odi series latest marathi news)
नेमकं काय म्हणाला राशिद खान?
ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने आमच्यादेशाविरूद्धची मालिका खेळायला नकार दिल्याने निराश झालो आहे. मला माझ्या देशाचं प्रतिनिधित्त्व करण्याचा खूप अभिमान आहे. जागतिक स्तरावर आमच्या देशाने प्रगती केली असून (CA) ने घेतलेला निर्णयाने आमच्या देशाला मागे ढकलल्यासारखं आहे. आमच्यासोबत खेळण्याने ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाला खेळावं वाटत नसेल तर मलासुद्धा बिग बॅश लीगमध्ये खेळण्याबाबत विचार करावा लागेल, असं राशिद खानने आपल्य पोस्टमध्ये म्हटलं आहे.
राशिदच्या या निर्णयानंतर क्रीडा विश्वातील चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. देशप्रेम असावं तर असं, अशी कौतुकाची थापही त्याला दिली आहे. बरेसचे खेळाडू हे आपण देशासाठी खेळायला पूर्ण तंदुरूस्त नसून देशांतर्गत किंवा बाहेरच्या देशातील लीगसाठी उपलब्ध असल्याचं दिसून आलं आहे. मात्र राशिदने देशाचा प्रश्न समोर असल्यावर वैयक्तिक करोडो रूपयांवर पाणी सोडायची तयारी दाखवली आहे. त्यामुळे भारताचे स्टार खेळाडू जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा यांनाही क्रीडा चाहत्यांनी फैलावर घेतलं.
Cricket! The only hope for the country.
— Rashid Khan (@rashidkhan_19) January 12, 2023
Keep politics out of it. @CricketAus @BBL @ACBofficialspic.twitter.com/ZPpvOBetPJ
नेमका काय आहे वाद?
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ फेब्रुवारी महिन्यात भारत (Australia vs India) दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यात चार कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. भारत दौऱ्यानंतर यूएईमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही खेळणार होते. पण तालिबानच्या काही निर्णयांना विरोध करण्यासाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने मोठं पाऊल उचललं खेळणार नसल्याचं सांगितलं आहे.