एकीकडे संपूर्ण देश होळी साजरी करत असताना दुसरीकडे क्रिकेट चाहत्यांना एक अशी बातमी मिळाली. अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू हजरतुल्ला झाझाई याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याने आपली मुलगी गमावली आहे जिचे वय अवघे दोन वर्ष होते. या दुःखद घटनेची माहिती त्याचा सहकारी करीम जनात याने सोशल मीडियावर शेअर केली. करीमने सांगितले की, 'झाझईने आपली मुलगी गमावली आहे, त्यामुळे त्यांचे कुटुंब दु:खात आहे. क्रिकेट समुदाय आणि चाहत्यांना या कठीण काळात झझाई आणि त्याच्या कुटुंबियांना प्रार्थना आणि पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.'
करीम जनातने हजरतुल्ला झाझाईच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, 'तुम्हा सर्वांसोबत ही दु:खद बातमी सांगताना मला खूप वाईट वाटत आहे. हजरतुल्ला झाझईसारखा माझा जवळचा मित्र आणि भाऊ याने आपली मुलगी गमावली आहे. त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी हा खूप कठीण काळ आहे. कृपया त्यांना तुमच्या प्रार्थनेत लक्षात ठेवा. हजरतुल्ला झाझाई आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत.'
हे ही वाचा: 'हा' आहे एकाच कसोटी सामन्यात हॅटट्रिक आणि शतक झळकावणारा जगातील एकमेव क्रिकेटपटू
हे ही वाचा: IPL 2025 पूर्वी मुंबई इंडियन्सला मिळणार मोठा धक्का, जसप्रीत बुमराहबाबत आली 'ही' मोठी बातमी
या दु:खद घटनेनंतर झाझाई आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती द्यावी, अशी प्रार्थना क्रिकेट चाहत्यांनी केली आहे. जगभरातील अनेक खेळाडू आणि क्रिकेटच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्यासाठी मेसेज आणि प्रार्थना शेअर केल्या आहेत.
हे ही वाचा: 'भारतीय खेळाडू इतर लीगमध्ये...' इंझमाम उल हक पुन्हा एकदा बरळला; सर्व देशांना केलं जाहीर आवाहन
हजरतुल्ला झाझाई हा डावखुरा फलंदाज वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी पिता झाला. या खेळाडूने अफगाणिस्तानसाठी 16 एकदिवसीय आणि 45 टी-20 सामने खेळले आहेत. झाझाईने अफगाणिस्तानसाठी एक शतक आणि 5 आंतरराष्ट्रीय अर्धशतके झळकावली आहेत. झाझाई गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अफगाणिस्तानकडून शेवटचा खेळला होता. हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात त्याने 20 धावा केल्या होत्या.