Champion Trophy 2025, India vs New Zealand Final: दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रविवारी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करून तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद पटकावले. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकल्यानंतर, सगळेच आनंदात दिसले. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सेलिब्रेशन करत होते. दरम्यान भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो करोडो भारतीयांची लोकांची मने जिंकेल. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रविवारी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून भारताने तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे विजेतेपद पटकावले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर संपूर्ण भारतीय संघ जल्लोषात मग्न होता, तेव्हा अचानक भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली एका महिलेच्या पायाला स्पर्श करताना दिसला. कोण आहे ही महिला? जाणून घेऊयात...
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद जिंकल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू आनंद साजरा करत होते. एवढंच नाही तर खेळाडूंचे कुटुंबीयसुद्धा या सेलिब्रेशनचा भाग झाले होते. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी त्याच्या आईची विराट कोहलीची ओळख करून देत आहे. विराट कोहली ओळख होताच लगेच मोहम्मद शमीच्या आईच्या पाया पडतो आणि त्यांचे आशीर्वाद घेतो. याशिवाय विराट शमी आणि त्याच्या कुटुंबियांसोबत काही फोटोही काढतो.
#ViratKohli touched Mohammad Shami 's mom's feet and took blessings
— Che_ (@ChekrishnaCk) March 9, 2025
#ChampionsTrophy2025 #INDvsNZ #RohitSharma #IndianCricketTeampic.twitter.com/J05NxTXCmK
हे ही वाचा: भारताच्या विजेतेपदानंतर गावस्कर लहान मुलाप्रमाणे उड्या मारू लागले, अनोख्या सेलिब्रेशनचा VIDEO VIRAL
Virat Kohli touched Mohammad Shami's mother's feet and clicked a picture with Shami's family. pic.twitter.com/amTeurTJ4k
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 9, 2025
हे ही वाचा: Trending Quiz: भारताची ती खास नदी, जिच्या पाण्यात वाहते सोने!
चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावल्यानंतर विराट कोहली म्हणाला की, "हे शानदार होते, ऑस्ट्रेलियाच्या कठीण दौऱ्यानंतर आम्हाला पुनरागमन करायचे होते. काही उत्तम तरुणांसोबत खेळणे खूप छान होते. ते पुढे जात आहेत आणि भारताला योग्य दिशेने घेऊन जात आहेत. जेव्हा तुम्ही निघाल तेव्हा, तुम्हाला चांगल्या स्थितीत सोडायचे असते. शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी अनेक उत्कृष्ट खेळी खेळल्या आहेत. संघ चांगल्या हातात आहे."