Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2025 जिंकताच RCB विकायला काढली? कोण आहेत मालक? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

RCB : पंजाब किंग्सला पराभूत करून त्यांनी आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. मात्र या विजयानंतर आता ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार आरसीबीचे मालक आता फ्रेंचायझी विकायच्या तयारीत आहेत. 

IPL 2025 जिंकताच RCB विकायला काढली? कोण आहेत मालक? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Royal Challengers Bengaluru : आयपीएल 2025 (IPL 2025) ही स्पर्धा 3 जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) संघाने जिंकली. पंजाब किंग्सला पराभूत करून त्यांनी आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. मात्र या विजयानंतर आता ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार आरसीबीचे मालक आता फ्रेंचायझी विकायच्या तयारीत आहेत. जर आरसीबीचा संघ विकला जातो तर हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा सौदा असू शकतो, कारण आरसीबीच्या मालकांनी फ्रेंचायझीची विक्री करण्यासाठी एक मोठी किंमत ठरवली आहे. 

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार यूनाइटेड स्पिरिट लिमिटेड कंपनीने आरसीबी फ्रेंचायझी 2 अरब डॉलर म्हणजेच 17 हजार कोटींना विकण्याचा विचार केला आहे. आरसीबी संघाचे मालक मॅकडॉवल्स व्हिस्की बनवणारी कंपनी यूनाइटेड स्पिरिट लिमिटेड ही आहे. यूनाइटेड स्पिरिट लिमिटेड कंपनी ही पूर्वी विजय माल्याची होती. मात्र विजय माल्या कर्जबाजारी झाल्यावर ही कंपनी ब्रिटिशच्या डियाजियो कंपनीने खरेदी केली. डियाजियोकडेच सध्या आरसीबीची मालकी आहे.   

 2008 मध्ये किती होती आरसीबीची किंमत? 

आयपीएलची सुरुवात 2008 मध्ये झाली होती त्यावेळी आरसीबीची किंमत 111.6 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 476 कोटी इतकी होती. तेव्हा आरसीबी ही आयपीएलमधील दुसरी सर्वात सर्वात महागडी टीम होती. विजय माल्याने त्याची कंपनी यूनाइटेड स्पिरिट लिमिटेडला आरसीबीचा मालकी हक्क दिला होता. 2014 मध्ये ब्रिटिश कंपनी डियाजियोने यूनाइटेड स्पिरिट लिमिटेडमधील मोठा हिस्सा खरेदी केला आणि त्यानंतर 2016 मध्ये कंपनीने संपूर्ण आरसीबी फ्रेंचायझी विकत घेतली.

हेही वाचा : Video : Out होताच आर अश्विनची आदळआपट, महिला अंपायरवर काढला राग, ठोठावली शिक्षा

 

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा सौदा :

आरसीबी संघ 17 हजार कोटींमध्ये विकला जातो तर हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा सौदा असेल. यापूर्वी कोणताही संघ एवढ्या मोठ्या किंमतीला विकला गेला नव्हता. आयपीएलमध्ये 2022 मध्ये दोन नवीन संघ सामील झाले. लखनऊ सुपर जाएंट्स संघाला RPSG ग्रुप ने 7,090 कोटींना खरेदी केलं. तर CVC कॅपिटलने गुजरात टाइटंसला 5,625 कोटींना विकत घेतले. 

Read More