Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL नंतर चेन्नईचा 'हा' खेळाडू चढणार बोहल्यावर

आयपीएलच्या अंतिम सामन्यानंतर चेन्नईचा हा खेळाडू लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. या खेळाडूने आयपीएलच्या मैदानातचं आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केले होते. आता तो आपल्या गर्लफ्रेंड सोबतचं लग्न बंधनात अडकणार आहे.  

IPL नंतर चेन्नईचा 'हा' खेळाडू चढणार बोहल्यावर

मुंबई : आयपीएलच्या अंतिम सामन्यानंतर चेन्नईचा हा खेळाडू लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. या खेळाडूने आयपीएलच्या मैदानातचं आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केले होते. आता तो आपल्या गर्लफ्रेंड सोबतचं लग्न बंधनात अडकणार आहे.  
      
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर त्याची दीर्घकाळाची मैत्रीण जया भारद्वाजसोबत पुढच्या महिन्यात १ जून रोजी लग्न करणार आहे. गेल्या वर्षी आयपीएल सामन्यादरम्यान जया भारद्वाजला त्याने भर मैदानात प्रपोज केले होते. 

दरम्यान आता आयपीएल नंतर हे दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. सध्या दीपक चहर आणि जया भारद्वाज यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

fallbacks

चहरला 14 कोटींची बोली 

चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने IPL 2022 च्या मेगा लिलावात दीपक चहरला तब्बल 14 कोटी रुपयांना विकत घेतले. मात्र पाठीच्या दुखापतीमुळे चहर आयपीएलच्या संपूर्ण हंगामातून बाहेर पडलाय. यंदाच्या हंगामात चेन्नईचा संघ चमकदार अशी कामगिरी करू शकला नाही आहे. 14 पैकी फक्त चार सामने चेन्नई जिंकलाय.  

दीपक चहरची कामगिरी 
दीपक चहरने भारतासाठी 20 टी-20 सामने तर सात एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, त्याने अनुक्रमे 26 आणि 10 विकेट घेतल्या आहेत. IPL बद्दल बोलायचे झाले तर 29 वर्षीय दीपक चहरने 63 सामन्यात 29.19 च्या सरासरीने एकूण 59 विकेट्स घेतल्या आहेत. 

Read More