Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Team India: श्रीलंका सिरीजनंतर टीम इंडियाचे खेळाडू तब्बल 'इतके' दिवस बेरोजगार!

Team India: आता श्रीलंकेच्या दौऱ्यावर टीम इंडियाचा पुढचा दौरा कोणत्या देशासोबत आणि कधी असणार आहे ते पाहुयात.

Team India: श्रीलंका सिरीजनंतर टीम इंडियाचे खेळाडू तब्बल 'इतके' दिवस बेरोजगार!

Team India: सध्या टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. आज भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये शेवटचा वनडे सामना खेळवण्यात येणार आहे. दरम्यान यानंतर टीम इंडियाचं शेड्यूल कसं असणार आहे, हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. जगातील सर्वात व्यस्त टीममध्ये गणल्या जाणाऱ्या टीम इंडिया विरुद्ध आयपीएल 2024 पासून ते सतत क्रिकेट खेळतये. पहिल्यांदा T20 वर्ल्डकप, नंतर झिम्बाब्वे आणि त्यानंतर आता श्रीलंकेचा दौरा. 

अशातच आता श्रीलंकेच्या दौऱ्यावर टीम इंडियाचा पुढचा दौरा कोणत्या देशासोबत आणि कधी असणार आहे ते पाहुयात.

टीम इंडियाला मिळणार 42 दिवसांचा आराम

श्रीलंकेच्या दौऱ्यावर टीम इंडियाच्या खेळाडूंना बरेच दिवस आराम मिळू शकणार आहे. यावेळी श्रीलंकेच्या दौऱ्यानंतर टीम इंडियाला पुढचा दौरा थेट 42 दिवसांनंतर करायचा आहे. यावेळी 7 जुलैनंतर टीम इंडिया थेट 19 सप्टेंबर रोजी बांगलादेशविरूद्ध खेळणार आहे. त्यामुळे टीम इंडियाचे खेळाडू तब्बल एक महिन्याहून जास्त मैदानाबाहेर असणार आहे.   

बांगलादेशाची टीम येणार भारतात

बांगलादेशचा टीम सप्टेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत दौऱ्यावर बांगलादेश टीम इंडियासोबत दोन टेस्ट आणि तीन टी-20 सामन्यांची सिरीज खेळणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन टेस्ट सामन्यांच्या सिरीजला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. यावेळी सिरीजमधील पहिला टेस्ट सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर आणि दुसरा टेस्ट सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. 

6 ऑक्टोबरपासून रंगणार टी-20 सिरीज

भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 सिरीजला हिमाचल प्रदेशातील धरमशालामध्ये ६ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. यानंतर सिरीजतील उर्वरित दोन सामने 9 ऑक्टोबरला दिल्ली आणि 12 ऑक्टोबरला हैदराबादमध्ये होणार आहेत.

बांगलादेशानंतर न्यूझीलंडशी भिडणार टीम इंडिया

बांगलादेशविरुद्धची टी-20 सिरीज संपताच न्यूझीलंडची टीम 3 टेस्ट सामन्यांच्या सिरीजसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. 16 ऑक्टोबरपासून बेंगळुरूमध्ये तीन सामन्यांच्या सिरीजला सुरुवात होणार आहे. यानंतर दुसरा टेस्ट सामना 24 ऑक्टोबरपासून पुण्यात आणि तिसरा सामना 1 नोव्हेंबरपासून मुंबईत खेळवला जाणार आहे.

Read More