Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियात शतक ठोकत सचिनसह अनेकांना टाकलं मागे

भारतीय टीमचा कर्णधार अजिंक्य रहाणेचं दमदार शतक

अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियात शतक ठोकत सचिनसह अनेकांना टाकलं मागे

Ind vs Aus : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर दुसरा टेस्ट सामना सुरु आहे. या बॉक्सिंग डे टेस्ट सामन्यात भारतीय टीमचा कर्णधार अजिंक्य रहाणेने दमदार शतक ठोकलं आहे. रहाणेने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहे. रहाणेने अशा वेळी शतक ठोकलं जेव्हा भारतीय संघाला त्याची गरज होती. त्याने कर्णधार म्हणून चांगली खेळी केली.

विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये चौथ्या क्रमाकांवर बॅटींगसाठी आलेल्या अजिंक्य रहाणेने 195 बॉलमध्ये 11 फोरच्या मदतीने शतक ठोकलं. हे त्याचं 12 वं शतक होतं. रहाणे जेव्हा बॅटींगसाठी आला तेव्हा सामन्यावर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची पकड होती. अजिंक्या रहाणेने एक बाजुने इनिंग सांभाळली होती.

अजिंक्य रहाणे कर्णधार म्हणून भारताकडून बॉक्सिंग डे टेस्ट मॅचमध्ये दोन शतक ठोकणारा पहिला खेळाडू बनला आहे. कर्णधार रहाणेने बॉक्सिंग डे टेस्ट सामन्यात भारताकडून 21 वर्षानंतर शतक ठोकलं आहे. त्याने सचिन तेंडुलकरची याबाबतीत बरोबरी केली आहे. सचिनने 1999 मध्ये कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध बॉक्सिंग डे टेस्ट सामन्यात शतक ठोकलं होतं.

बॉक्सिंग डे टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध फक्त 5 बॅट्समनने शतक ठोकले आहे. ज्यामध्ये अजिंक्य रहाणेचं नाव देखील आलं आहे. त्याने दुसरं शतक ठोकत सर्वांना मागे टाकलं आहे. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी शतक ठोकलं आहे. पण या सगळ्यांनी एकच शतक ठोकलं आहे.

Read More