Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'काय फालतू बॅटिंग केली... ' अजिंक्य रहाणेने श्रेयस समोर स्वतःच्याच टीमची केली बदनामी, नेमकं काय घडलं?

IPL 2025 : अवघ्या 20 ओव्हरमध्ये विजयासाठी 112 धावांचं टार्गेट असताना सुद्धा केकेआरचा संघ हे टार्गेट पूर्ण करण्यात अयशस्वी ठरला. त्यानंतर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

'काय फालतू बॅटिंग केली... ' अजिंक्य रहाणेने श्रेयस समोर स्वतःच्याच टीमची केली बदनामी, नेमकं काय घडलं?

IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये मंगळवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स (KKR VS PBKS) यांच्यात रोमांचक सामना पार पडला. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्सने (KKR V PBKS) 16 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडून आयपीएलच्या इतिहासातील सर्वात छोटा स्कोअर डिफेंड केला. त्यांनी केकेआरला विजयासाठी 111 धावांचं टार्गेट देऊन त्यांना 16 धावांनी पराभूत केलं. अवघ्या 20 ओव्हरमध्ये विजयासाठी 112 धावांचं टार्गेट असताना सुद्धा केकेआरचा संघ हे टार्गेट पूर्ण करण्यात अयशस्वी ठरला. त्यानंतर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

पंजाब किंग्सने मंगळवारी टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी त्यांना केकेआरच्या गोलंदाजी समोर जास्त धावा करता आल्या नाहीत आणि ते 111 धावांवर ऑल आऊट झाले. कोलकाता नाईट रायडर्स 112 धावांचे टार्गेट सहज पूर्ण करेल अशी शक्यता असताना पंजाब किंग्सच्या गोलंदाजांनी सामना फिरवला आणि 95 धावांवर केकेआरला ऑल आऊट केले. यात अंगकृष रघुवंशी (37), आंद्रे रसेल (17), अजिंक्य रहाणे (17) इत्यादी वगळता केकेआच्या  कोणत्याही फलंदाजाला दोन अंकी धावसंख्या करता आली नाही. लाजिरवाण्या पराभवानंतर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने स्वतः श्रेयस अय्यरशी बोलताना केकेआरच्या फलंदाजांकडून झालेली चूक मान्य केली. 

हेही वाचा : KKR चा धुरळा उडवणाऱ्या मॅच विनर युझवेंद्र चहलला प्रीति झिंटाने काय काय दिलं?

 

पंजाबने 95 धावांवर केकेआरच्या संपूर्ण संघाला ऑलआउट केले आणि सामना जिंकला. सामना संपल्यावर अजिंक्य रहाणे हा पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि इतर खेळाडूंना भेटण्यासाठी आला. तेव्हा तो श्रेयस अय्यरशी हात मिळवताना म्हणाला की, 'काय फालतू बॅटिंग केली ना आम्ही'. यावेळी अजिंक्य हसण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. 

पाहा व्हिडीओ : 

युझवेंद्र चहलचा परफॉर्मन्स : 

KKR विरुद्ध सामन्यापूर्वी युझवेंद्र चहलच्या नावावर आयपीएल 2025 मढी 5 सामन्यांमध्ये 2 विकेट होते. पण कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सामन्यात त्याने दमदार कामगिरी केली आणि 4 विकेट घेण्यात त्याला यश आले. 4 ओव्हर टाकताना चहलने केवळ 28 धावा दिल्या. चहलने रहाणेला बाद केले आणि सामना फिरला. त्यानंतर अंगक्रीश रघुवन्शी, रिंकू सिंग आणि रामंदिप सिंग यांनाही बाद केले गेले. 

Read More