Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

घराबाहेर पडायचं..... नाही; पाहा रहाणेची चिमुकलीही देतेय गोड संदेश

 बाबांच्या प्रश्नावर लेकीचं उत्तर...  

घराबाहेर पडायचं..... नाही; पाहा रहाणेची चिमुकलीही देतेय गोड संदेश

मुंबई :  Coronavirusने साऱ्या जगाला दहशतीच्या सावटाखाली आणलं आहे. सुरुवातीला फक्त चीनच्या वुहान प्रांतात फोफोवणाऱ्या या विषाणूने पाहता पाहता साऱ्या जगात हातपाय परसले. भारतातही सध्या त्याचे परिणाम दिसून येऊ लागले आहेत. कोरोनाचा देशात वाढणारा हाच प्रादुर्भाव पाहता काही दिवसांपूर्वी संपूर्ण देशात लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले. परिणामी अत्यावश्यक सेवा वगळता इतर अनेक क्षेत्रांचं कामकाज ठप्प झालं. कला आणि क्रीडा विश्वावरही याचे पडसाद दिसून आले. 

नागरिकांना घरातच थांबण्याचं आवाहन करत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सहकार्य करण्याची विनंतीपर विचारणा सरकारकडून करण्यात आली. अनेकांनीच मोदींच्या या निर्णय़ाचं समर्थन करत घरातच राहण्याला प्राधान्य दिलं. काहींनी मात्र हे निर्बंध गांभीर्याने घेतले नाहीत. 

अशा सर्व मंडळींनी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या मुलीचा व्हिडिओ एकदा पाहायलाच हवा. अजिंक्यचा पत्नीने म्हणजेच राधिका धोपावकर हिने सोशल मीडियावर आर्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये अजिंक्य त्याच्या लेकीला एक प्रश्न विचारताना दिसत आहे. घराच्या बाहेर पडायचं आता?, असं त्याने विचारताच आपल्या बाबांच्या प्रश्नाचं उत्तर देत हुशार आर्या नकारार्थी मान हलवत आहे. 

 
 
 
 

A post shared by Radhika Rahane (@radhika_dhopavkar) on

 

लेकीची ही हुशारी पाहून अजिंक्यलाही या चिमुकलीचा हेवा वाटला असणार यात शंका नाही. '...घ्या आता आर्यायलाही हे (कोरोना टाळण्यासाठी घरातच थांबायचं आहे) माहित आहे', असं कॅप्शन देत अजिंक्यच्या पत्नीने पोस्ट केलेला हा व्हिडिओ सध्या अनेकांचं लक्ष वेधत आहे. 

 

Read More