Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

मुंबईच्या टीममध्ये स्थान नाहीच; Arjun Tendulkar ला करावं लागतंय हे काम!

अर्जुनला अजूनही मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये खेळण्यासाठी संधी देण्यात आलेली नाही. 

मुंबईच्या टीममध्ये स्थान नाहीच; Arjun Tendulkar ला करावं लागतंय हे काम!

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या टीमसाठी यंदाचा सिझन एका वाईट स्वप्नापेक्षा कमी नाहीये. प्लेऑफच्या रेसमधून बाहेर पडणारी मुंबई पहिली टीम होती. दरम्यान यावेळी चाहत्यांनी टीममध्ये अर्जुन तेंडुलकरचा समावेश करावा अशी मागणी केली होती. मात्र त्याला संधी देण्यात आली नाही. पण अशा परिस्थितीत अर्जुनने त्याची एक वेगळी झलक लोकांसमोर आणली आहे. 

क्रिकेटर धवल कुलकर्णीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीयो स्टोरीमध्ये पोस्ट केला होता. यामध्ये मुंबई इंडियन्सचा गोलंदाज अर्जुन तेंडुलकर कुकींग करताना दिसतोय. चिकन रोस्ट करत असल्याचा अर्जुनचा हा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याला धवल कुलकर्णीने मास्टरशेफ असं कॅप्शन दिलं आहे.

fallbacks

अर्जुन तेंडुलकरऐवजी बेबी-एबीडी म्हणजे डेवाल्ड ब्रेविसने देखील कुकिंगचा आनंद घेतला. अर्जुनला अजूनही मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये खेळण्यासाठी संधी देण्यात आलेली नाही. 

अर्जुन तेंडुलकरला आयपीएलमध्ये मुंबई टीमने 30 लाख रुपयांना खरेदी केलं होतं. अर्जुन तेंडुलकरला आयपीएल 2021 मध्ये मुंबई इंडियन्सने विकत घेतलं होतं. विशेष म्हणजे IPL 2021 मध्ये अर्जुन तेंडुलकरला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. तर यंदाच्या सिझनमध्येही तो अजून डेब्यूच्या प्रतिक्षेत आहे.

Read More