Akash Deep New Car : इंग्लंड दौऱ्यात केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे भारताचा स्टार गोलंदाज आकाश दीप (Akash Deep) सध्या चर्चेत आहे. त्याने दुसऱ्या सामन्यात पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. आकाशदीपने काही दिवसांपूर्वीच काळ्या रंगाची फॉर्च्यूनर कार खरेदी केली होती. ही कार खरेदी करणं त्याचं लहानपणापासूनच स्वप्न होतं. पण आता याच कारणामुळे आकाश दीप अडचणीत आला आहे. उत्तर प्रदेशच्या वाहतूक विभागाने आकाशदीपला नोटीस बजावली आहे. यासोबतच, वाहनाच्या डीलरला सुद्धा एक नोटीस पाठवण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश परिवहन विभागाने केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 44 अंतर्गत मेसर्स आकाश दीप आणि लखनऊमधील सनी मोटर्स डीलरशिप मेसर्स विरुद्ध कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आकाशदीपवर आरोप आहे की तो हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) शिवाय गाडी वापरत होता. या चिनहटच्या डीलरशिपला एका महिन्यासाठी वाहन डिलिव्हरीपासून निलंबित करण्यात आले आहे कारण या डीलरने वाहन नोंदणी पूर्ण न करता आणि त्यावर HSRP प्लेट नसताना वाहन डिलिव्हरी केली.
आकाश दीपने इंस्टाग्रामवर कार खरेदीचा आनंद फॅन्ससोबत शेअर केला. कुटुंबासोबत शोरूममध्ये घेतलेल्या फोटोंमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान स्पष्ट दिसत होता. पोस्टला त्यांनी कॅप्शन दिलं “सपना पूरा हुआ. चाबियां मिलीं. उन लोगों के साथ जो सबसे ज्यादा मायने रखते हैं.” म्हणजेच त्यांच्या आयुष्यातील एक मोठं स्वप्न पूर्ण झाल्याचा हा क्षण होता.
इंग्लंड मालिकेत आकाश दीपने दुसऱ्या टेस्टमध्ये 10 विकेट्स घेतल्या होत्या. लॉर्ड्समध्ये जसप्रीत बुमराह परत आल्यानंतरही त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली, जिथे त्याने 1 विकेट मिळवली. मॅंचेस्टर टेस्टमध्ये दुखापतीमुळ तो बाहेर होता, पण ओव्हलमध्ये झालेल्या शेवटच्या टेस्टमध्ये त्याने दमदार पुनरागमन केले. त्या सामन्यात त्याने 2 विकेट्स घेतल्या आणि त्यासोबतच 66 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे भारताला चांगला स्कोर उभारता आला आणि अखेरीस सामना जिंकण्यात यश आलं. आतापर्यंत आकाश दीपने 10 टेस्ट सामन्यांत 28 विकेट्स घेतल्या आहेत आणि आता मैदानाबाहेरही ते आपल्या यशाचा आनंद घेत आहेत.
1. आकाशदीपने कोणती कार खरेदी केली?
आकाशदीपने लखनऊ येथील सनी मोटर्स डीलरशिपमधून काळ्या रंगाची टोयोटा फॉर्च्यूनर कार खरेदी केली.
2. आकाशदीपला नोटीस का मिळाली?
आकाशदीपवर आरोप आहे की त्याने हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) न लावता आणि गाडीची नोंदणी पूर्ण न करता फॉर्च्यूनर कारचा वापर केला. तसेच, डीलरशिपनेही नोंदणी प्रक्रिया पूर्ण न करता आणि HSRP न लावता गाडी डिलिव्हर केल्यामुळे त्यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे
3. HSRP का महत्त्वाचे आहे?
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) आणि थर्ड रजिस्ट्रेशन मार्क हे मोटर वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 39 अंतर्गत अनिवार्य आहे. हे वाहनाची ओळख आणि रस्ता सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. मशहूर व्यक्तींच्या नियमभंगामुळे समाजात चुकीचा संदेश जातो, म्हणून परिवहन विभागाने सख्त कारवाई केली आहे.