Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'तू क्रिकेट सोडून दे, आता...', लेकाने लिंगबदल केल्यानंतर संजय बांगरने स्पष्ट सांगितलं, म्हणाली 'आत्महत्या करावं अशी...'

संजय बांगरचा (Sanjay Bangar) मुलगा आर्यन लिंगबदल शस्त्रक्रिया करुन अनाया झाली आहे. दरम्यान यानंतर वडिलांनी मला क्रिकेट सोडून दे असा सल्ला दिला होता असा खुलासा अनायाने केला आहे.   

'तू क्रिकेट सोडून दे, आता...', लेकाने लिंगबदल केल्यानंतर संजय बांगरने स्पष्ट सांगितलं, म्हणाली 'आत्महत्या करावं अशी...'

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर संजय बांगरचा मुलगा आर्यनची चर्चा आहे. याचं कारण आर्यनने लिंगबदल शस्त्रक्रिया केली असून, अनाया झाली आहे. अनायाने आपली नवीन ओळख निर्माण करण्यासाठी हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी आणि लिंग-बदल शस्त्रक्रिया केली आहे. तथापि, ही नवी ओळख निर्माण करताना अनायाला फार मोठी किंमत मोजावी लागली आहे. तिच्या वडिलांनी क्रिकेटमध्ये आता तिच्यासाठी जागा नाही असं स्पष्ट सांगितलं आहे. आपल्या निर्णयामुळे आधीच समाजाचा रोष स्विकारावा लागत असताना, अनायाला आपला आवडता खेळही सोडून द्यावा लागला.

लल्लनटॉपला दिलेल्या एका मुलाखतीत, अनायाने क्रिकेट सोडण्याच्या तिच्या निर्णयाबद्दल उघडपणे सांगितलं. अनायाने सांगितलं की तिचे वडील संजय यांनी भविष्यात क्रिकेटमध्ये तिच्यासाठी जागा नाही हे स्पष्ट केलं होतं. नेमकं त्यांच्यात काय संभाषण झालं होतं हे जाणून घ्या. 

मुलाखतकार: तू म्हणालीस की तुझ्या वडिलांनी तुला क्रिकेट खेळणं थांबवण्यास सांगितलं, कारण आता या खेळात तुझ्यासाठी जागा नाही.

अनाया: मला या मुलाखतीत माझ्या वडिलांबद्दल बोलायचं नाही.

मुलाखतकार: व्हिडिओ आधीच सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे. तू स्वतःच तो उल्लेख केला आहेस, मी फक्त तुला कोट करत आहे. 

अनया: हो, मला याची जाणीव आहे. ते फक्त हेच सांगत होते की क्रिकेटमध्ये माझ्यासाठी जागा नाही. मला स्वतःसाठी भूमिका घ्यावी लागली. माझ्या मनात आत्महत्येचे विचार आले कारण मला असं वाटलं की संपूर्ण जग माझ्या विरोधात आहे आणि मी घेतलेल्या निर्णयामुळे (स्त्री होण्यासाठी हार्मोन थेरपी), आता या व्यवस्थेत माझ्यासाठी जागा उरली नाही. मूलभूत संधी आणि अधिकारही आता माझ्यासाठी राहिले नाहीत".

"कुटुंबाच्या दृष्टिकोनातून माझ्याकडे अजूनही स्वतःसाठी जागा होती. पण समाजात, क्रिकेटमध्ये किंवा बाहेरील जगात ती नव्हती", असंही तिने सांगितलं. 
 
मुलाखतीत अनायाने एका वरिष्ठ क्रिकेटपटूने आपल्याला न्यूड फोटो पाठवले होते असा खुलासाही केला. कारण तिच्यात झालेल्या बदलाची माहिती मिळाल्यानंतर आपण शरीरसंबंध ठेवू शकतो अशी त्याला अपेक्षा होती असं तिचं म्हणणं होतं. 

"मी मुशीर खान, सरफराज खान आणि यशस्वी जयस्वाल सारख्या काही प्रसिद्ध क्रिकेटपटूंसोबत खेळले आहे. माझे वडील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व असल्याने मला स्वतःबद्दल गुप्तता बाळगावी लागली. क्रिकेट जगत असुरक्षितता आणि विषारी पुरुषत्वाने भरलेलं आहे," असं ती पुढे म्हणाली.

"मला पाठिंबा मिळाला आहे आणि काही छळ देखील झाला आहे. काही क्रिकेटपटूंनी मला त्यांचे नग्न फोटो पाठवले," असा खुलासाही तिने केला. 

"ती व्यक्ती सर्वांसमोर शिव्या द्यायची. नंतर तीच व्यक्ती माझ्या शेजारी बसून माझे फोटो मागत होती. दुसऱ्या एका घटनेत, मी भारतात असताना, एका अनुभवी क्रिकेटपटूला माझ्या परिस्थितीबद्दल सांगितले. त्याने मला सांगितलं की चल गाडीत जाऊया. मला तुझ्यासोबत संबंध ठेवायचे आहेत," असं तिने स्पष्ट केले.

Read More